तुमच्याही घरांमध्ये उंदरांनी हैदोस घातला आहे का? ‘या’ छोट्या ट्रिक्स वापरा,उंदीर घरातून होतील गायब

Published on -

आपण प्रत्येकजण घराची आणि घराच्या आजूबाजूची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर ठेवत असतो. परंतु तरीदेखील घरांमध्ये झुरळ तसेच उंदीर यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून येतो. घरामध्ये जर थोडीफार अडगळीची जागा असेल  तर त्या ठिकाणी आपल्याला उंदीरांचे वास्तव्य दिसून येते.

घरामध्ये जर उंदीर राहिले तर धान्याचे पोते तसेच कपडे व इतर महत्वाच्या वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अशावेळी उंदरांचा नायनाट किंवा बंदोबस्त करण्यासाठी अनेक पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु तरीदेखील उंदरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे या लेखात आपण अशा काही सोप्या ट्रिक्स बघणार आहोत ज्यांचा वापर केल्यामुळे ताबडतोब उंदीर घरातून गायब होतात.

 या ट्रिक्स वापरा आणि उंदरांवर नियंत्रण मिळवा

1- कापूरचा वापर करून जर तुम्ही उंदीरांना घालवून लावण्यासाठी कापूरची मदत घेतली तर त्यांना न मारता देखील तुम्ही घराबाहेर काढू शकतात. याकरिता घरातील कोपऱ्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी उंदरांची ये जा मोठ्या प्रमाणावर असते त्या जागेवर कापूर ठेवावे. यामुळे उंदीर तुमच्या घरापासून दूरच राहतील. कापूरचा जो काही वास येतो तो उंदीरांना अजिबात आवडत नाही.

2- ब्रेडमध्ये दहीचा वापर आपल्याला माहित आहे की साधारणपणे उंदीर पकडण्यासाठी आपण पिंजऱ्यांचा वापर करतो. परंतु या पिंजरांमध्ये उंदीर अडकत नाहीत. परंतु यामध्ये जर तुम्ही उंदीरांना पकडण्यासाठी जर पिंजरा लावला व त्यामध्ये जर ब्रेड ठेवून त्यावर थोडं दही टाकले तर त्याच्या वासामुळे उंदीर लवकर पिंजऱ्यामध्ये घुसतात व अडकतात.

3- तुरटीची पावडर वापरा घरांमध्ये उंदीर असतील तर तुरटीची पावडर बनवावी व ही तयार पावडर थोड्या पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. हे द्रावण केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये उंदीर दिसतात त्या ठिकाणी या द्रावणाची फवारणी करावी किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही तुरटी पावडरची फवारणी करू शकतात.

4- पुदिन्याचा वापर उंदीरांचा वावर वाढला असेल तर तुम्ही घरातील कोपऱ्यात किंवा इतर ठिकाणी पुदिना ठेवला तरी फायदा मिळतो. अशावेळी जर घरात उंदीर आले तर लगेच ते घराबाहेर पळतात. कारण उंदीरांना पुदिनाचा वास अजिबात आवडत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!