Vande Bharat Express : 22 जानेवारी 2024 ला पाचशे वर्षांपासून रामभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिर राम भक्तांसाठी खुले करण्यात आले. श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामरायांच्या भव्य राम मंदिराचे 22 जानेवारीला उद्घाटन झाले आणि त्यानंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही वाढ झाली.
दरम्यान श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे रेल्वे कडून अयोध्यासाठी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार असून आज आपण याच नव्या वंदे भारत एक्सप्रेसची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

कसा असणार नव्या वंदे भारत ट्रेनचा रूट?
मीडिया रिपोर्टनुसार, मेरठ ते वाराणसी या मार्गावर आता वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे आणि ही गाडी श्रीक्षेत्र अयोध्या मार्गे धावेल. म्हणजेच आता प्रभू श्री रामरायांच्या जन्मभूमीला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. या गाडीमुळे रामभक्तांना जलद गतीने श्रीक्षेत्र अयोध्या गाठता येणार आहे.
ही गाडी मेरठ आणि वाराणसी येथील रामभक्तांसाठी फायद्याची राहणार आहे. मेरठ ते वाराणसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाणाऱ्या रामभक्तांचा प्रवास यामुळे वेगवान होईल अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या मेरठ ते लखनऊ दरम्यान जी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे तीच वंदे भारत आता वाराणसी कॅन्टपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी अयोध्या धाम मार्गे चालवली जाणार आहे.
कधी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 27 ऑगस्ट 2025 पासून सर्वसामान्यांसाठी सुरू केली जाणार आहे. परिणामी मेरठ येथील भाविकांना श्रीक्षेत्र काशी आणि श्री क्षेत्र अयोध्याला दर्शनासाठी सहज पोहोचता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
मेरठ ते वाराणसी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या प्रवाशांना 18 ते 20 तासांचा वेळ लागतोय मात्र वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास कालावधी तब्बल 12 तासांपर्यंत कमी होणार आहे.
नवीन गाडीचे वेळापत्रक कसे असणार?
मेरठ – वाराणसी वंदे भारत ट्रेन ही सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी मेरठ रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांना ही गाडी वाराणसी रेल्वे स्थानकावर पोहोचेल. ही गाडी अयोध्येला तीन वाजून 55 मिनिटांनी पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर वाराणसी मेरठ वंदे भारत ट्रेन सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी वाराणसी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी मेरठ रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्याला सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.