महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनचा बहुमान ! कुठून कुठंपर्यंत धावणार?

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला आणखी एका नव्या वंदे भारतची भेट मिळणार आहे. दरम्यान आता आपण याचबाबत डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. 

Published on -

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि याचमुळे भारतीय रेल्वेने आता वंदे भारत एक्सप्रेसचा शयनयान प्रकार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे.

सध्या रेल्वे कडून ज्या वंदे भारत सुरू करण्यात आल्या आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र भारतीय रेल्वे आता वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन लॉन्च करणार असून महाराष्ट्राला सुद्धा या गाडीची भेट मिळणार आहे.

कोणत्या रूटवर धावणार वंदे भारत स्लीपर 

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबईला मिळणार आहे. ही गाडी मुंबई ते दिल्ली या मार्गांवर चालवली जाणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

खरे तर मुंबई ते दिल्लीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नवा महामार्ग विकसित केला जात आहे. या नव्या महामार्गाचे बहुतांशी काम पूर्ण सुद्धा झाले आहे. यामुळे येत्या काही वर्षांनी हा महामार्ग पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली दरम्यान चा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे आता या दोन्ही शहरा दरम्यानचा रेल्वेचा प्रवास देखील वेगवान होणार आहे कारण की या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे.

सोळा तासांचा प्रवास फक्त बारा तासात 

महत्वाची बाब म्हणजे ही गाडी 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास फक्त आणि फक्त 12 तासात करता येणे शक्य होईल.

सध्या या मार्गावर सुरू असणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला मुंबई दिल्ली प्रवासासाठी सोळा तासांचा वेळ लागतो. म्हणजेच प्रवासाच्या वेळेत 4 तासांची बचत होणार नाही आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या आर्थिक वर्षात सरकारने 30 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे.

विशेष बाब अशी की या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन सुद्धा नुकतीच संपन्न झाली आहे. यामुळे आता रेल्वे बोर्डाकडून या गाडीचा रूट आणि भाडे ठरवण्याचे काम सुरू आहे. यामुळे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!