कल्याणजवळील ‘या’ रेल्वेस्थानकावर वंदे भारतसह सर्वच एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळणार ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाठपुरावा सुरु

कल्याणजवळील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत सारख्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान, आता या मागणीवर सरकारकडून काय निर्णय घेतला जाईल ? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Published on -

Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यामुळे अनेक जण मुंबई जवळील कल्याण मध्ये स्थायिक झाले आहेत तर काही लोक कल्याणच्याही पुढे म्हणजेच बदलापूर मध्ये वास्तव्याला आले आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये बदलापूरचा विस्तार झपाट्याने झाला असून येथील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस दुप्पट होत आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर बदलापूर रेल्वे स्थानकावरून लोकल च्या गाड्यांची संख्या वाढवण्यात आली पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांकडून सातत्याने उपस्थित होत आहे.

एकीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावरून लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडे आता बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनस बनवण्यात यावे अशी सुद्धा मागणी उपस्थित करण्यात आली आहे. यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 

बदलापूर रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वे लोकलमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनसचा दर्जा देऊन येथे वंदे भारतसह इतर मेल एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी उपस्थित केली होती.

दरम्यान पाटकर यांच्या या मागणीनुसार आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. गडकरी यांनी अश्विनी वैष्णव यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.

पातकर यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून याठिकाणी बदलापूर-पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी केली होती.

तसेच सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस सारख्या महत्त्वाच्या गाड्यांना सुद्धा बदलापूर येथे थांबा द्यावा अशी ही मागणी पातकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आली. द

रम्यान पातकर यांच्या या प्रस्तावाची पडताळणी करून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याची बातमी समोर आली आहे.

यामुळे, खरंच बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनस चा दर्जा मिळणार का ? या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या एक्सप्रेस गाड्या थांबणार का? अशा चर्चा सध्या बदलापूरकरांमध्ये रंगल्या आहेत. दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या मागणीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!