विजय संकेश्वर आहेत भारतातील ट्रक किंग! एका ट्रक पासून सुरू झालेला प्रवास पोहोचला 4800 कमर्शियल वाहनांपर्यंत,वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:

कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात आधी आपल्याला त्या क्षेत्राविषयी मनामध्ये क्रेझ किंवा आवड असणे गरजेचे असते. ज्या क्षेत्रामध्ये व्यक्तीला आवड असते त्या क्षेत्रात माणूस नक्कीच यशस्वी होतो असे म्हणतात. कारण आवडीच्या क्षेत्रामध्ये माणूस मन लावून काम करतो आणि कष्टाने आणि नेटाने पुढे जातो.

कष्ट करण्याची क्षमता किंवा ताकद, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी जिद्द व मनाची तयारी, वाटेल त्या प्रसंगाला किंवा परिस्थितीला तोंड देत मार्ग काढण्याची कुवत इत्यादी गुण यशस्वी होण्यासाठी खूप उपयुक्त असतात. असे गुण असलेले व्यक्ती हे यशस्वी होतातच. आपण बरेच व्यक्तींच्या किंवा उद्योजकांच्या यशाच्या कहाण्या ऐकतो किंवा वाचतो.

यामध्ये आपल्याला प्रकर्षाने एक बाब दिसून येते आणि ती म्हणजे त्यांनी केलेली सुरुवात ही अगदी छोटीशी असते. परंतु कालांतराने त्यामध्ये कष्ट व मेहनतीने ते खूप मोठी भरारी घेतात. अगदी याच पद्धतीने जर आपण विजय संकेश्वर यांची यशोगाथा पाहिली तर ती खूप कौतुकास्पद असे आहे.

व्हीआरएल लॉजिस्टिक हे नाव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकले असेल किंवा वाचले असेल. याच व्हीआरएल  कंपनीचे ते मालक असून एका ट्रक पासून सुरू केलेला त्यांनी या व्यवसायातील प्रवास आज पाच हजार गाड्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. भारतामध्ये त्यांना ट्रक किंग म्हणून ओळखले जाते.

 विजय संकेश्वर यांची यशोगाथा

जर आपण विजय संकेश्वर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचा कौटुंबिक व्यवसाय हा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. परंतु या व्यवसाया व्यतिरिक्त त्यांच्या मनामध्ये कायम वेगळा काहीतरी व्यवसाय करायचं याबद्दल विचार चाले व त्या दृष्टिकोनातून ते सातत्याने प्रयत्न करत होते. यामुळे त्यांना बऱ्याचदा कुटुंबाकडून विरोध देखील झाला.

अक्षरशा लॉजिस्टिक व्यवसायामध्ये पडण्याकरिता त्यांना आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जावे लागले. हा व्यवसाय सुरू करण्याकरिता त्यांनी एका परिचित व्यक्तीकडून काही पैसे उसने घेतले व एक ट्रक खरेदी केला. साधारणपणे ही घटना 1976 या सालची आहे. या उसने घेतलेल्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या ट्रकवर त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. परंतु नेहमीप्रमाणे कुठल्याही गोष्टीची सुरुवातीमध्ये खूप अडचणी येतात व अगदी तशाच अडचणी त्यांना देखील खूप आल्या.

परंतु या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी हळूहळू प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू ठेवले व असे करत करत 1994 पर्यंत त्यांच्याकडे तब्बल 150 ट्रक झाल्या. वास्तविक पाहता जर आपण हा एक कालावधी पाहिला तर लॉजिस्टिक व्यवसायासाठी म्हणावा तितका सकारात्मक वातावरण त्यावेळेस नव्हते किंवा हा व्यवसाय संघटित देखील नव्हता. तसेच दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता.

अशा कठीण व विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी 1990 मध्ये कमर्शियल अर्थात व्यावसायिक वाहतुकीतून प्रवासी वाहतुकीकडे वळण्याचे ठरवले व विजयानंद ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली. याच कंपनीचे नाव नंतर व्हीआरएल लॉजिस्टिक असं ठेवण्यात आले. हे नाव आपल्याला चांगल्यापैकी परिचित आहे. एका ट्रक पासून सुरू झालेला त्यांचा व त्यांच्या व्हीआरएल लॉजिस्टिकचा प्रवास आज 4800 पेक्षा जास्त कमर्शियल वाहनांवर येऊन पोहोचला आहे.

या कंपनीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जो काही वाहनांचा ताफा आहे त्यामुळे या कंपनीचे नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे.अवघ्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या कंपनीचे शेअर्स देखील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. पाच वर्षांमध्ये व्हीआरएल कंपनीने त्यांच्या शेअर होल्डर्सना तब्बल 115.05 टक्क्यांचा परतावा देखील दिला आहे.

जर आज व्हीआरएल लॉजिस्टिकचे बाजार मूल्य किंवा मार्केट कॅप पाहिले तर ते सहा हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीने विजय संकेश्वर यांना यश मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागली हे मात्र निश्चित.

यावरून आपल्याला दिसून येते की आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कठोर मेहनतीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe