अबब….! पुण्याचा लक्ष्या बैल 30 लाख 11 हजार 111 रुपयात विक्री; बैलगाडा शर्यतीतला हुकमी एक्काच्या विशेषता पहाच

Published on -

Viral Bull News : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालक लाखो रुपयांच्या बैलांची खरेदी करत असतात. किंवा घरच्या गाईचं खोंड घाटात शर्यतीसाठी तयार करतात. अशातच पुणे जिल्ह्यातून बैलगाडा शर्यतीसाठी एका हौशी शेतकऱ्याने तब्बल 30 लाख रुपयाला लक्ष्या बैलाची खरेदी केली आहे.

यामुळे सध्या या 30 लाख रुपये किमतीच्या लक्ष्याची बैलगाडा प्रेमींमध्ये मोठी चर्चा पहावयास मिळत आहे. हा लक्ष्या बैल जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील माउलीकृपा बैलगाडा संघटनेच्या पोपट, सुरेश सोनबा बढेकर यांच्या बैलगाडा शर्यतीत धावणारा हुकमी एक्का आहे. या संघटनेचे अध्यक्ष श्याम बडेकर यांनी सांगितले की हा लक्षा बैल 30 लाख 11 हजार 111 रुपयाला विक्री झाला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैलाने पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा शर्यतीमध्ये विजयश्री प्राप्त केला आहे. घाटांमध्ये लक्ष्या हुकमी एक्का आहे. आता या बैलाला गावडेवाडी ( ता.आंबेगाव) येथील कैलास भगवंता गावडे यांनी खरेदी केले आहे. निश्चितच, या हौशी शेतकऱ्याने विक्रमी किमतीत या बैलाची खरेदी करत हौसेला काही मोल नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. वास्तविक, शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी लावली होती.

मात्र त्याच्या नंतर ही बंदी माननीय उच्च न्यायालयाकडून उठवण्यात आली आहे. यामुळे आता बैलगाडा घाटात करतोय राडा असं म्हणतं बैलगाडा मालक बैलगाडा शर्यत मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात गावागावात यात्रा निमित्ताने बैलगाडा शर्यतीचा बिगुल वाजत आहे.

घाटात सर्जा-राजाची जोड कमाल करत आहे. दरम्यान लक्षा बैलाची तीस लाख रुपयांहून अधिकच्या किमतीत विक्री झाली असल्याने पुन्हा एकदा बैलगाडा मालकांची बैलगाडा शर्यतीवर किती अपार श्रद्धा आहे याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने प्रस्तुत केल जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News