Viral News : देशात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. जेवढ्या झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे तेवढाच विकास देशाचा होत आहे. आता लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. मात्र वाहनांची संख्या वाढली, रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढली आणि अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वधारली आहे.
मात्र अनेकदा रस्त्यांवर होणारे अपघात वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे भीषण रूप घेत असतात आणि जीवित हानी घडत असते. अपघाताची माहिती लगेचच अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला मिळत नसल्याने तसेच रुग्णवाहिकेला आणि प्रशासनाला अपघाताची माहिती वेळेवर मिळत नसल्याने अनेकांचा जीव जातो. अपघाताची माहिती मिळत नाही म्हणून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही. परिणामी अनेक वाहनचालकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागतो.
हे पण वाचा :- 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये 2859 पदाची मेगा भरती, आजच Apply करा
दरम्यान जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोरानं असं काही भन्नाट संशोधन केला आहे की ज्याच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनचालकांचा, लोकांचा जीव यामुळे वाचू शकणार आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या दूधपुरी या गावातील राजेंद्र पाचफुले या शेतकऱ्याच्या मुलान अपघात अलर्ट सेन्सर विकसित केले आहे. हे असे तंत्रज्ञान आहे ज्याच्या मदतीने गाडीचा अपघात झाला की याची माहिती प्रशासनाला तसेच कुटुंबातील व्यक्तींना मिळणार आहे.
यासाठी या तंत्रज्ञानामध्ये प्रशासनाचे आणि कुटुंबांतील व्यक्तीचे नंबर मात्र कोडिंग करून ठेवावे लागतात. या यंत्रामुळे कोडिंग केलेल्या मोबाईल नंबर वर अपघात झाला की लगेचच अलर्ट वाजतो. मोबाईलवर अलर्ट येत असल्यामुळे प्रशासन आणि कुटुंबाला याची माहिती लगेचच मिळू शकणार आहे. शिवाय या संसरच्या मदतीने अपघात कुठे झाला आहे याचे लोकेशन देखील प्रशासन आणि परिवारवाल्यांना मिळणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात ‘हे’ एक काम कराच लाखोत होणार कमाई; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीचा जीव वाचवता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. राजेंद्र पाचफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अपघात होतात. या अपघाताची मात्र वेळेवर माहिती मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. परंतु जर हे सेंसर दुचाकीला लावले तर अपघाताचा अलर्ट आणि लोकेशन लगेचच समजू शकणार आहे.
यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीचा जीव वेळेत वाचवता येणार आहे. खरं पाहता राजेंद्र एका शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांची घरची परिस्थितीही हलाखिची आहे. केवळ दोन एकर शेती त्यांच्याकडे आहे. त्यात आई वडिल कष्ट करून घराचा गाडा हाकत आहेत. हालाखीच्या परिस्थितीमध्ये राजेंद्र यांनी केलेलं हे भन्नाट संशोधन निश्चितच कौतुकास्पद असून यामुळे अनेकांचा जीव वाचवता येणे शक्य होणार आहे.
हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर…