पर्यटनाच्या स्थळांच्या दृष्टिकोनातून भारत हा एक समृद्ध असा देश असून भारताला मोठ्या प्रमाणावर भौगोलिक परंपरा लाभली असल्याने अनेक निसर्गाने नटलेली पर्यटन स्थळे भारतामध्ये आहेत. भारतातील कुठल्याही राज्यांमध्ये जर तुम्ही गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी पर्यटन स्थळांची रेलचेल पाहायला मिळते.
त्यामुळे भारताला दरवर्षी विदेशातून देखील लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. इतकेच नाही तर देशांतर्गत पर्यटनाची संख्या देखील खूप मोठी आहे. पर्यटन स्थळांच्या बाबतीत मध्य प्रदेश हे राज्य देखील खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी देखील अनेक पर्यटन स्थळे आहेत.
या अनुषंगाने जर तुम्हाला या ऑक्टोबर महिन्यामध्ये एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे आणि घनदाट असा जंगलांनी वेढलेल्या पंचमढीला भेट देऊ शकतात.
पंचमढी आहे ऑक्टोबर महिन्यात भेट देण्यासाठी महत्त्वाचे हिल स्टेशन
पंचमढी हे एक प्रसिद्ध असे भारतातील हिल स्टेशन असून ते मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आहे. या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये खूपच नयनरम्य असे नैसर्गिक दृश्य पाहायला मिळते व त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचमढीला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.
पंचमढीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सातपुड्याची राणी म्हणून ओळखले जाते व मिनी काश्मीर म्हणून देखील पंचमढीला वेगळी ओळख आहे. या ठिकाणी असलेले शांत वातावरण तसेच सुंदर अशी तलाव आणि घनदाट जंगले अविस्मरणीय असे क्षण आपल्याला खासकरून जगायला मिळतात.
या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहा तसेच अनेक ऐतिहासिक मंदिरे, शांत प्रवाह असलेले धबधबे आणि हिरवीगार पसरलेली जंगले इत्यादीं करिता पंचमढी एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे.
गेल्यावर तुम्ही या ठिकाणी असलेला अप्सरा विहार तसेच बी फॉल, धुपगड तसेच जटाशंकर लेणी व पांडवलेणी इत्यादी सुंदर ठिकाणी पाहू शकतात. पंचमढी येथील बी फॉल हा एक लोकप्रिय धबधबा आहे.
अप्सरा तलाव आणि जटाशंकर लेणी आहेत खास
पंचमढीला गेल्यावर तुम्ही या ठिकाणी असलेला अप्सरा विहार तलाव पाहू शकतात. कुटुंब व घरातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी अप्सरा तलाव हे उत्तम ठिकाण आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या धुपगड टेकडीवर जाऊन तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहू शकतात. हे सातपुड्याचे सर्वोच्च शिखर असून ते महादेव पर्वतावर आहे.
तसे या ठिकाणी असलेल्या जटाशंकर लेणी पर्यटकांमध्ये खूप महत्त्वाच्या असून या ठिकाणी तुम्हाला ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनासाठी खूप महत्त्वाचे आहेत व या ठिकाणी भगवान शंकरांची नैसर्गिक शिवलिंगाच्या आकाराची मूर्ती असून ती भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी पांडव वनवासात असताना काही कालावधी करीता या ठिकाणी राहिले होते असे मानले जाते. यामुळेच या लेण्यांना पांडवलेणी म्हणून देखील ओळखले जाते.
ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी महत्त्वाचे ठिकाण
तसेच तुम्हाला जर ट्रेकिंग,हायकिंगची आवड असेल तर त्या ठिकाणचे शांत आणि आरामदायी वातावरण तुम्हाला ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेता येतो. जंगल सफारी सारख्या साहसी क्रियाकल्पांचा आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात.
ठिकाणची निरव शांतता तुम्हाला दररोजच्या जीवनातील धावपळीपासून मुक्तता देते व काही काळ तुम्ही निवांत घालवून जीवनातील या अविस्मरणीय क्षणांचा ठेवा आयुष्यभर तुमच्या जवळ ठेवू शकतात.