दिवाळीच्या सुट्टीमध्ये जोडीदारासोबत भारतातील ‘या’ हिल स्टेशनला द्या भेट! जोडीदारासोबतचे क्षण बनवा अविस्मरणीय

अनेक जण जोडीदारासोबत सुट्टीवर जाण्याचा प्लान करतात व एखाद्या निसर्गरम्य अशा हिल स्टेशनला भेट द्यावी अशाप्रकारे ट्रीपचे नियोजन करत असतात. भारताच्या अनुषंगाने बघितले तर भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये निसर्गाने समृद्ध असलेली अनेक हिल स्टेशन असून सोबत इतर अनेक पर्यटन स्थळे देखील आहेत.

Published on -

Hill Station In India:- बऱ्याचदा अनेक जण जोडीदारासोबत सुट्टीवर जाण्याचा प्लान करतात व एखाद्या निसर्गरम्य अशा हिल स्टेशनला भेट द्यावी अशाप्रकारे ट्रीपचे नियोजन करत असतात. भारताच्या अनुषंगाने बघितले तर भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये निसर्गाने समृद्ध असलेली अनेक हिल स्टेशन असून सोबत इतर अनेक पर्यटन स्थळे देखील आहेत.

त्यामुळे या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुमचा देखील तुमच्या जोडीदारासोबत एन्जॉय करण्याचा प्लॅन असेल व तुम्हाला एखाद्या हिल स्टेशनला भेट द्यायची असेल तर या लेखातील माहिती तुम्हाला फायद्याची ठरणार आहे.

या लेखामध्ये आपण भारतातील महत्त्वाच्या अशा काही हिल स्टेशनची माहिती घेणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यानंतर आयुष्यभर या भेटीचे क्षण तुमच्या मनात ठासून कोरलेले राहतील व आयुष्यभर अविस्मरणीय स्वरूपात राहतील.

 भारतातील ही हिल स्टेशन आहेत निसर्गाने समृद्ध

1- राणीखेत राणीखेत हे भारतातील उत्तराखंड राज्यात असलेले एक सुंदर डोंगराळ ठिकाण असून तुम्ही आणि तुमची पत्नी जर निसर्गप्रेमी असाल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. राणीखेतला क्वीन्स ग्राउंड म्हणून देखील ओळखले जाते.

या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला देवदार आणि ओकची झाडे पाहायला मिळतात. या ठिकाणाचा डोंगराळ परिसर आणि हिरवळ पाहून डोळ्यांना निरव अशी शांतता लाभते. राणीखेतला जाताना मध्ये नैनीताल लागते व तुम्हाला हवे असल्यास नैनितालमध्ये देखील वेळ घालवू शकतात.

2- कौसानी कौसानी हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यात असलेले एक सुंदर हिल स्टेशन असून याच्या आजूबाजूच्या पर्वत शिखरांवर सूर्यकिरण खेळत असताना रंगाचा जादुई खेळ पाण्यात खूप मजा येते.

पाइन आणि निळ्या देवदार वृक्षाच्या जंगलांनी झाकलेल्या टेकडीवर हे हिल स्टेशन वसले असून या ठिकाणी गेल्यावर तुम्ही त्रिशूल, नंदादेवी आणि पराक्रमी पंचचुली सारखी हिमालयाची शिखरे देखील पाहू शकतात. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला मंत्रमुग्ध करते.

3- भिमताल हे उत्तराखंड मधील नैनिताल जिल्ह्यात असलेले छोटेसे शहर असून हे प्राचीन ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाचे नाव महाभारतातील भिमाच्या नावावरून पडले आहे. या ठिकाणी नैसर्गिक आणि अध्यात्मिक पर्यटन तुम्हाला करता येते.

भिमाताल भिमेश्वर महादेव मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या भिमताल तलावाच्या काठावर एक जुने शिवमंदिर असून जे पांडवांच्या वनवासाच्या काळात भीमाने या ठिकाणी भेट दिल्यावर बांधले होते असे मानले जाते.

4- मुक्तेश्वर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यात असलेल्या मुक्तेश्वर या अतिशय सुंदर हिल स्टेशनला भेट देऊ शकतात.

साहसी पर्यटनाची हौस असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. हे हिल स्टेशन फळबागा तसेच घनदाट पाईन वृक्षाच्या जंगलांनी वेढलेले आहे. या हिल स्टेशन मध्ये असलेला भालू धबधबा देखील खूप प्रसिद्ध असून हा धबधबा पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक या ठिकाणी भेट देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News