शेतकऱ्याचा नाद नाही करायचा ! वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याने शेतात बनवलं फाइव्ह स्टार मचान; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा, पहा….

Ajay Patil
Published:
Wardha Farmer Make A Machan

Wardha Farmer Make A Machan : शेती हा एक असा व्यवसाय आहे ज्या व्यवसायात कोणत्याच दिवशी सुट्टी नसते. हा व्यवसाय बारामाही चालणारा व्यवसाय असून शेतात नित्यनियमाने शेतकऱ्यांना जावे लागते. शेतातील वेगवेगळी प्रकारची कामे रोजच करावी लागतात. पिकांना रात्री-अपरात्री उठून पाणी द्यावे लागते. निश्चितच हे सर्व काम आव्हानात्मक आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतामध्ये वन्यजीवापासून धोका देखील असतो.

यामुळे शेतकरी आपल्या वावरात निवाऱ्याची व्यवस्था करतात. शेतातच राहण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी मचान बनवलं जात. मात्र हे मचान सोयी सुविधांनी युक्त नसतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र वर्ध्यामधील एका युवा शेतकऱ्याने यावर रामबाण उपाय शोधून काढला असून अशा मचानची निर्मिती केली आहे ज्यामध्ये सर्व सोयी सुविधा आहेत.

हे पण वाचा :- संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता ‘हे’ काम करावं लागणार, नाहीतर….

जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मौजे कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे यांनी हे मचान बांधले आहे. योगेश सांगतात की, त्यांच्या बाजूच्या शेतात रात्री थांबलेल्या शेतकऱ्याला बिबट्याने फरपटत नेलं. यामुळे त्यांनी शेतामध्ये असं मचान बांधण्याच ठरवलं ज्याला वन्य प्राण्यांचा धोका राहणार नाही. त्यासाठी त्याने सहा फूट उंच मचान तयार केलं आहे.

विशेष म्हणजे या मचानमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. यामध्ये पंखा आहे, बल्बची सोय आहे. रेडिओ बसवण्यात आला आहे तसेच मोबाईल चार्जिंग साठी देखील सुविधा करून ठेवली आहे. विशेष म्हणजे मचान छान सजवल असून घरामध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्या सर्व सोयी सुविधा यामध्ये त्यांनी काढून घेतल्या आहेत.

हे पण वाचा :- कडू कारल्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! 3 एकरात लागवड केली अन तब्बल 10 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

मोबाईल चार्जिंगसाठी, बल्बसाठी आणि पंख्यासाठी वीज ही सोलरच्या माध्यमातून तयार होते. यासाठी मचानवर सोलर पॅनल बसवून विजेची निर्मिती करण्यात आली आहे. योगेश सांगतात की यामध्ये दोन जण बसू शकतात. योगेशने तयार केलेले हे मचान सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय आहे. इतर शेतकरी देखील योगेशकडे अशा प्रकारचे मचान बांधून देण्यासाठी आग्रह करत आहेत.

विशेष म्हणजे योगेश देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उत्सुक आहे. निश्चितच या युवा शेतकऱ्याने बांधलेल हे मचान सोयी सुविधांनी युक्त असल्याने याचा त्यांना मोठा फायदा होत असून आता शेतीची निगराणी ते यां मचानवर बसून करत आहेत.

हे पण वाचा :- मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe