Waterfalls In Nashik: नाशिक जिल्ह्यात करा पावसाळ्यात भटकंती, ‘या’ 3 धबधब्यांचे दृश्य मनाला करेल मंत्रमुग्ध

Ajay Patil
Published:
waterfalls

Waterfalls In Nashik:- सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस कोसळत असून महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या डोंगररांगा या पावसात न्हाऊन निघालेल्या आहेत. सगळीकडे हिरवीगार मखमली असे चादर पसरलेली असून या डोंगर रांगांमधून खळाळून वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे पाहण्याचा आनंद हा मनाला मंत्रमुग्ध करतो. जर तुमचा या पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी नाशिक जिल्हा खूप महत्त्वाचा ठरेल.

कारण या जिल्ह्याला मिळालेले निसर्गसौंदर्य आणि आध्यात्मिक दृष्ट्या असलेले महत्त्व खूप मोठे आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक आध्यात्मिक क्षेत्र देखील असून तेवढ्याच प्रमाणात नैसर्गिक ठिकाणे देखील आहेत. अध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. तसेच साहसी पर्यटनासाठी त्रिगलवाडी आणि हरिहर किल्ला देखील खूप महत्त्वाचा आहे. याच दृष्टिकोनातून आपण नाशिक जिल्ह्यात असलेले प्रमुख तीन धबधब्यांची माहिती घेणार आहोत जी निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहेत.

 नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे तीन धबधबे

1- दुगरवाडी धबधबा नाशिक जिल्ह्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर या आध्यात्मिक क्षेत्रापासून साधारणपणे आठ किलोमीटर अंतरावर आणि नाशिक शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर दुगरवाडी धबधबा आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम जे काही नैसर्गिक धबधबे आहेत त्यांच्यापैकी हा एक धबधबा आहे.

पावसाळ्यात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असून या ठिकाणी असलेले घनदाट जंगल, धबधबा आणि या ठिकाणची मनाला मोहन टाकणारी ताजी आणि थंडगार हवा खूप मोहक आहे. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना त्रंबकेश्वर पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या  सापगाव पर्यंत जावे लागते व त्यापासून धबधबा पार्किंग क्षेत्र चार किलोमीटर आहे. त्यानंतर या ठिकाणहून एक ते दोन किलोमीटर धबधब्याच्या ठिकाणी चालत जावे लागते.

5 Most Beautiful Waterfalls Around Nashik | So Nashik

2- विहगाव धबधबा विहिगाव धबधबा हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन स्थान पैकी एक असून पश्चिम घाटाच्या जंगलाच्या मध्यभागी असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांच्या शूटिंग देखील केल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम असून

या धबधब्याच्या आजूबाजूला असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्यामुळे फिरण्याचा आनंद द्विगुणीत होतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हिरव्यागार वातावरणात सहल आयोजित करून या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. एवढेच नाही तर विहिगाव धबधब्या जवळ एक रॅपलिंग साठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रॅपलिंग चा अनुभव तुम्हाला मंत्रमुग्ध करतो.

Vihigaon Waterfalls - Nashik: Get the Detail of Vihigaon Waterfalls on  Times of India Travel

3- दूधसागर धबधबा नासिक शहरातील गंगापूर जवळ असलेला सोमेश्वर धबधबा व सोमेश्वर महादेव मंदिरापासून दोन किलोमीटर आणि नाशिक सेंट्रल बस स्टॅन्ड पासून नऊ किलोमीटर अंतरावर हा एक आश्चर्यकारक धबधबा आहे. महाराष्ट्र मध्ये जेवढे प्रमुख धबधबे आहेत त्यांच्यापैकी दूध सागर धबधबा हा एक आहे. दूध सागर धबधब्याला सोमेश्वर धबधबा असे देखील म्हटले जाते.

हे नाशिक जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून गोदावरी नदीमुळे हा सुंदर असा धबधबा तयार झाला आहे. याची उंची साधारणपणे दहा मीटर इतकी आहे  पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असलेल्या वनस्पतीमुळे या ठिकाणी सुंदर दृश्य पाहायला मिळते. कुटुंबासमवेत एक छानशी पिकनिक आयोजित करून या ठिकाणी जाऊन आनंद घेता येणे शक्य आहे. महत्त्वाचे  म्हणजे या धबधब्याच्या जवळ बालाजी मंदिर असून ते देखील पाहण्यासारखे आहे.

Dudhsagar Waterfall - Nashik | Bhakta Niwas | #1 Travel website for  Spiritual and religious Travel hotel bookings

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe