Weather Update : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे अद्याप अवकाळीपासून शेतकऱ्यांची सुटका झालेली नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- 22 वर्षीय युवा शेतकऱ्याचा प्रयोग ! आठ एकरात मिरचीची शेती सुरू केली, झाली 50 लाखांची कमाई; वाचा ही यशोगाथा
आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आता पुन्हा पाऊस पडणार असल्याने थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके देखील यामुळे वाया जातील अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
IMD ने सांगितले आहे की, 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे. अर्थातच सोमवार, मंगळवार आणि बुधवार पुन्हा शेतकऱ्यांसाठी घातक सिद्ध होऊ शकतो.
हे पण वाचा :- भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, असा करा अर्ज
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
IMD ने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, गडचिरोली, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी देखील पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यांनी पुढील 2-3 दिवस विदर्भात मेघ गर्जना, विजा, जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचे तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी म्हणजे आज विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून यासंबंधीत जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा