Weather Update : राज्यात गेल्या महिन्यापासून हवामानात सातत्याने मोठा बदल होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र राज्यातील काही जिल्हे वगळता इतरत्र तापमानात वाढ होत आहे. यामुळे उकाडा जाणवत असून नागरिक परेशान झाले आहेत. दरम्यान आता विदर्भातून एक मोठी माहिती समोर आली आहे. विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! विरार-अलिबाग कॉरिडोरबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय; आता ‘या’ महिन्यात सुरु होणार काम, पहा….
वास्तविक राज्यात सध्या कांदा काढण्याचे कामे जोमात सुरू आहेत. याशिवाय अनेक भागात डाळिंब समवेतच अन्य फळ पिकाची देखील काढणी सुरू आहे. अशातच नागपूर वेधशाळेने पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच ते सहा दिवस त्या भागात पाऊस पडणार असल्याने तेथील शेतकऱ्यांना मात्र सतर्क रहावे लागणार आहे.
विशेष म्हणजे विदर्भात काही ठिकाणी या कालावधीत गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विंड डिसटॅबन्समुळे बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक परिस्थिती तयार झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ शहरादरम्यान सुरू झाली स्पेशल सुपरफास्ट ट्रेन; पहा कसं आहे वेळापत्रक? कुठं आहेत थांबे?
नागपूर वेधशाळेसोबतच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव यांनी देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नुकताच सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख यांच्या मते राज्यात 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे.
या कालावधीत पडणारा पाऊस मात्र सर्व दूर राहणार नसून काही मोजक्याच ठिकाणी पाऊस पडेल असं त्यांनी मत व्यक्त केल आहे. शिवाय पुढल्या महिन्यातही पावसाची शक्यता कायम राहणार आहे. एकंदरीत अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डख म्हणताय की उद्यापासून आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? पहा…