Weather Update : महाराष्ट्रात सातत्याने हवामानात बिघाड होत आहे. मार्च महिन्यात ढगाळ हवामानामुळे अन अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील मराठवाड्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आणि पहिल्या पंधरवड्यानंतर लगेचच पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि काही जिल्ह्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. दरम्यान आता गेल्या 13-14 दिवसापासून या चालू महिन्यात देखील अवकाळी पाऊस पडत आहे.
हे पण वाचा :- सीआरपीएफमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल ‘इतक्या’ हजार रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू, पण……
तसेच काही जिल्ह्यात गारपीट देखील होत आहे. नासिक पुणे सातारा अहमदनगर या जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे. झालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील तब्बल 50 ते 60 गावांना गारपिटीचा फटका या चालू महिन्यात बसला आहे.
नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा तसेच डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. साहजिकच या गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा या तिन्ही पिकांना मोठा फटका बसणार आहे. सध्या जिल्ह्यात कांदा काढ आणि प्रगतीपथावर असून बहुतांश ठिकाणी द्राक्षे देखील काढणीला आली आहेत.
अनेकांचे डाळिंब देखील तयार झाले आहेत, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब बहार पकडला असेल त्या शेतकऱ्यांची डाळिंब आता काढणीला आली आहेत. निश्चितच या अवकाळीचा आणि गारपिटीचा नासिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा मोठा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता राहणार आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि यासंबंधी जिल्ह्यांना आयएमडीच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.
विदर्भातील मात्र सर्वच जिल्ह्यात पाऊस पुढील पाच दिवस कायम राहील अशी शक्यता आहे. निश्चितच उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भमधील जनतेला पुढील पाच दिवस अधिक सजग आणि सतर्क राहावे लागणार आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…