अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- कोची-येथील अनुभव समाधान सेवा प्रदाता (Software as a service) कंपनी SurveySparrow ने महिला भरतीसाठी नवीन पद्धत जाहीर केली आहे.
या कंपनीत सहभागी झालेल्या महिला उमेदवारांना 50 हजार रुपयांचा जॉईंग बोनस देणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की या उपक्रमांतर्गत प्रोडक्ट डेवलपर, गुणवत्ता विश्लेषक आणि तांत्रिक लेखक या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना हा बोनस देण्यात येणार आहे.

या महिलांना 15 एप्रिलपर्यंत कंपनीत रुजू व्हावे लागेल. कंपनीने 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम जाहीर केला. बहुतेक नोकऱ्या कोचीच्या बाहेर असून कंपनीला 50 नवीन कर्मचार्यांची गरज आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अभ्यासाचा हवाला देत कंपनीने म्हटले आहे
की लॉकडाऊननंतर केवळ 16 टक्के महिला नोकरी पुन्हा सुरू करु शकल्या आहेत. कंपनीचे संस्थापक शिहाब मोहम्मद म्हणाले की, अहवालात असा दावा केला गेला आहे की श्रमबलमध्ये महिलांचा सहभाग सर्वात खालच्या पातळीवर आला आहे.
50:50 च्या प्रमाणात महिला आणि पुरुष कर्मचारी :- शिहाब मोहम्मद म्हणाले की आम्ही सुरुवातीपासूनच महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना कंपनीत 50:50 च्या प्रमाणात ठेवण्याच्या धोरणावर काम केले आहे. हा उपक्रम सुरू होण्यापूर्वी कंपनीतील हे प्रमाण 30:70 पर्यंत आले .
या व्यतिरिक्त ही कंपनी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आपल्या कर्मचार्यांना फर्निचर खर्च देत आहे. याशिवाय इंटरनेट बिलही दिले जात आहे. लॉकडाऊनमध्ये कंपनीने आपल्या कर्मचार्यांना 30 टक्क्यांपर्यंत इंक्रीमेंट दिली आहे.
100 कर्मचारी कंपनीशी जोडलेले आहेत :- 2020 मध्ये, 50,000 ग्राहक आणि 100 कर्मचारी कंपनीशी संबंधित होते. यंदा हे दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मोहम्मद म्हणाले की, ‘जॉइनिंग बोनस’ नंतर आम्ही प्रथम व्हर्च्युअल हॅकाथॉन ‘हॅकर फ्लो’ सुरू करू. या अंतर्गत डेवलपर्स, विद्यार्थी आणि कोडींगमध्ये रस असणार्यांना एकाच व्यासपीठाअंतर्गत आणले जाईल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|