Lake Ladaki Scheme : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांकरिता शिक्षणापासून तर व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत करण्यात येते व अशा घटकांचे सामाजिक तसेच आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरण व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.
अशा अनेक प्रकारच्या योजना या भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये जर आपण विचार केला तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी तसेच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे तसेच मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे व मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

राज्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली असूनही योजना प्रत्येक मुलीसाठी खूप वरदान ठरणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेली लेक लाडकी योजना ही खूप महत्त्वाची योजना असून या योजनेची माहिती आपण घेणार आहोत.
कशी आहे नेमकी लेक लाडकी योजना?
राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाल्यावर त्या मुलीला पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिलीत जाईल तेव्हा 6000, सहाव्या इयत्तेत गेल्यानंतर 7000, अकरावीत गेल्यानंतर आठ हजार आणि जेव्हा त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा 75000 अशा प्रमाणे टप्प्याटप्प्याने त्या मुलीला एक लाख एक हजार रुपयांचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही योजना 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी राबवण्यात येणार आहे.
कोणत्या मुलींना मिळणार या योजनेचा लाभ?
एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबामध्ये जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार असून दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु याकरिता आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे राहील. एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. महत्वाचे म्हणजे जुळ्या असलेल्या दोन्ही मुलींना या योजनेअंतर्गत स्वतंत्रपणे लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अशा प्रकारे तुम्ही अधिकची माहिती घेऊन लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकता व मुलीच्या जन्मावर एक लाख एक हजार रुपयांचा सरकारकडून आर्थिक फायदा मिळवू शकता.