महामार्गावरून प्रवास करताना पेट्रोलच संपलं किंवा गाडीच खराब झाली तर काय कराल? हे वाचा आणि टेन्शनमुक्त प्रवास करा

तुम्हाला माहित नसेल की  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडून अनेक सुविधा या प्रवास करणाऱ्या व्यक्तींना मोफत दिल्या जातात. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पैसे देखील द्यावे लागत नाही. म्हणजेच या सेवा मोफत पुरवल्या जातात.

Ajay Patil
Published:
highway rule

बऱ्याचदा आपण कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत किंवा एकटे कारने प्रवासाला निघतो व प्रवास करत असताना आपण महामार्गावरून जात असतो. आपल्यापैकी अनेकांन अनुभव आला असेल की प्रवास करत असताना गाडीमध्ये अचानक काहीतरी बिघाड होतो किंवा गाडीचे पेट्रोल, डिझेल संपते. तसेच प्रवास करत असताना एखाद्या वेळेस दुर्दैवाने अपघात घडतो.

या आणि अनेक समस्या महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला अचानकपणे उद्भवू शकतात. अशावेळी मात्र माणसाला काहीच सुचत नाही आणि आता काय करावे याबाबत खूप मोठी समस्या निर्माण होते.

परंतु तुम्हाला माहित नसेल की  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडून अनेक सुविधा या प्रवास करणाऱ्या व्यक्तींना मोफत दिल्या जातात. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पैसे देखील द्यावे लागत नाही. म्हणजेच या सेवा मोफत पुरवल्या जातात.

 प्रवास करत असताना समस्या उद्भवल्या तर काय कराल?

1- पेट्रोल किंवा डिझेल संपले तर तुम्ही प्रवास करत आहात आणि अचानक डिझेल संपले तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. यावेळी तुम्ही शेवटचा जो टोल प्लाझा ओलांडला असेल व त्या ठिकाणी तुम्ही जो काही टोल भरला असेल त्या टोल च्या स्लिपच्या खालच्या बाजूला एक आपत्कालीन क्रमांक दिलेला असतो.

या आपत्कालीन क्रमांकवर तुम्ही कॉल केलास  पंधरा मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महत्वाचे म्हणजे 1033 या नंबरवर कॉल करून तुम्ही पाच ते दहा लिटर पेट्रोलची ऑर्डर देखील देऊ शकता व ही सेवा निशुल्क आहे.

2- एखाद्या रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर आराम करायला थांबलात महामार्गावरून गाडी चालवत असताना तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर बऱ्याचदा गाडी चालवत असताना थकवा जाणवायला लागतो. अशा प्रसंगांमध्ये जर तुम्हाला आराम करायची इच्छा झाली तर तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या कुठल्याही ढाब्यावर थांबून त्या ठिकाणी आराम करू शकता.

परंतु यासाठी तुम्हाला कोणीही बोलू शकत नाही किंवा नकार देऊ शकत नाही. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही त्या ठिकाणाचे पाणी किंवा शौचालयाचे सुविधा देखील फ्री मध्ये वापरू शकतात.

3- प्रवास करत असताना गाडी खराब झाली तर प्रवास करत असताना जर तुमची गाडीमध्ये काही बिघाड झाला व अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 1033 या क्रमांकावर कॉल करून मेकॅनिक किंवा क्रेनला कॉल करू शकतात.

त्यामध्ये मेकॅनिकला कॉल करण्याची सुविधा मोफत आहे. यामध्ये तुम्हाला गाडी दुरुस्त करण्यासाठीचा जो काही खर्च येतो तो मात्र द्यावा लागतो. दुसरे म्हणजे जर लवकर समस्या मिटणे शक्य नसेल तर तुम्ही वाहन क्रेनच्या माध्यमातून देखील उचलून घेऊन जाऊ शकता व जवळच्या सेवा केंद्रात नेऊ शकतात.

4- प्रवास करत असताना अचानक कोणाची तब्येत बिघडली तर तुम्ही हायवेवरून प्रवास करत आहात आणि प्रवासाच्या दरम्यान तुमची किंवा तुमच्या सोबत असलेल्या कोणत्याही व्यक्तीची तब्येत बिघडली तर तुम्ही वैद्यकीय आपत्कालीन फोन नंबरवर कॉल करू शकता.

यामध्ये तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या माध्यमातून 8577051000 आणि 7237999911 या ॲम्बुलन्स क्रमांकावर कॉल करू शकतात. या माध्यमातून काही कालावधीत ॲम्बुलन्स घटनास्थळी तुम्ही बोलवू शकतात. विशेष म्हणजे ॲम्बुलन्सची सुविधा देखील तुम्हाला मोफत दिली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe