सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणारे टॉप 10 देश कोणते ? भारता शेजारील ‘या’ देशांमधील हिंदू लोकसंख्या आहे उल्लेखनीय

गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. 2010 ते 2020 या कालावधीत हिंदूंच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून आज आपण या कालावधीच्या आकडेवारीनुसार जगातील टॉप 10 हिंदू देश कोणते आहेत याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Top Hindu Population Country : हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक जुन्या धर्मांपैकी एक. जागतिक पातळीवर हिंदूंच्या लोकसंख्येत अलीकडील काही वर्षांमध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चननंतर हिंदू धर्मियांच्या लोकसंख्येत कमालीची वाढ नमूद करण्यात आली आहे. प्यू रिसर्च या प्रसिद्ध सर्वेक्षण संस्थेने नुकताच जागतिक धार्मिक लोकसंख्येवरील एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे यात जागतिक पातळीवर हिंदूंच्या लोकसंख्येत वाढ झाली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणाऱ्या टॉप 10 देशांची माहिती जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची बाब अशी की यापैकी पाच देश हे मुस्लिम बहुल आहेत आणि या मुस्लिम बहुल देशांमध्ये हिंदूंची लोकसंख्या उल्लेखनीय आहे. प्यू रिसर्चच्या अहवालानुसार 2010 ते 2020 या दहा वर्षांच्या काळात म्हणजेच एका दशकात जगात सर्वाधिक वाढ मुस्लीम लोकसंख्येत झाली आहे. त्यानंतर ख्रिश्चन, नास्तिक आणि चौथ्या क्रमांकावर हिंदू धर्मीयांची लोकसंख्या असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात असे म्हटले गेले आहे की हिंदू धर्मीयांची लोकसंख्या सर्वात जास्त आशिया पॅसिफिक रीजनमध्ये आहे. या भागात संपूर्ण जगातील 99% लोक वास्तव्याला असल्याचे सांगितले गेले आहे.

टॉप 10 हिंदू लोकसंख्या असणारे देश

अहवालानुसार टॉप 10 हिंदू लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये आपल्या भारताचा पहिला नंबर लागतो. एकट्या भारतात संपूर्ण हिंदू लोकसंख्येचे 94.5% लोक वास्तव्याला आहेत. आपल्या देशातील लोकसंख्येत हिंदू धर्माचा वाटा 79 टक्के एवढा आहे. तर दुसरीकडे नेपाळमध्ये हा वाटा 81% आहे. हिंदू लोकसंख्या असलेल्या टॉप 10 देशांमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, अमेरिका, मलेशिया, यूके आणि युएई यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, गेल्या दशकात म्हणजेच 2010 ते 2020 या कालावधीत जागतिक पातळीवर हिंदूंची लोकसंख्या 12% नी वाढून 110 कोटींवरून 120 कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे मध्य पूर्व-उत्तर आफ्रिकेत हिंदूंची वाढ सर्वात जास्त झाली आहे. या भागात हिंदू लोकसंख्या 62 टक्क्यांनी वाढली आहे तर उत्तर अमेरिकेत 55 टक्क्यांनी हिंदू लोकसंख्या वाढली आहे. भारत आणि नेपाळनंतर बांगलादेशात सर्वाधिक हिंदू आहेत. बांगलादेशातील एकूण लोकसंख्येपैकी 7.9% लोक हिंदू आहेत.

बांगलादेश नंतर पाकिस्तानचा नंबर लागतो येथे एकूण लोकसंख्या पैकी 2.1% लोक हिंदू आहेत. पाचव्या क्रमांकावर इंडोनेशिया या देशाचा नंबर लागतो येथे एकूण लोकसंख्या पैकी 1.4 टक्के लोक हिंदू आहेत. सहाव्या क्रमांकावर श्रीलंका देशाचा नंबर लागतो या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 14.5% लोक हिंदू आहेत. या यादीत सातव्या क्रमांकावर अमेरिका, आठव्या क्रमांकावर मलेशिया नव्या क्रमांकावर युके आणि दहाव्या क्रमांकावर युएई या देशाचा नंबर लागतो. युएईमध्ये हिंदू लोकसंख्येचा वाटा 11.8% असून, जागतिक पातळीवर मात्र तो केवळ 0.1% आहे. दरम्यान या सर्वेक्षणामुळे जागतिक धार्मिक लोकसंख्येच्या बदलत्या चित्राची झलक समोर आली असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!