Post Office Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी होम लोन सहित आपल्या सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी केलेत. याशिवाय बँकांनी एफडी चे व्याजदरही कमी केले आहेत.
यामुळे रेपोरेट कपातीचा कर्ज घेतलेला ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे मोठा फटका सुद्धा बसला आहे. पण आजही पोस्टाच्या एफडी योजनेचे व्याजदर कायम आहे. म्हणून आज आपण पोस्टाच्या एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. पोस्टाच्या कोणत्या एफडी योजनेत सर्वाधिक व्याज मिळते आणि याच सर्वाधिक व्याज देणाऱ्या FD योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याच बाबतची संपूर्ण माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पोस्टाची सर्वाधिक व्याज देणारी एफडी योजना
पोस्ट ऑफिस कडून एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना सुरू करण्यात आली आहे. पोस्टाच्या एफडी योजनेचे नाव खरे तर टाईम डिपॉझिट योजना असे आहे. पोस्टाच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.9% दराने व्याज दिले जात आहे. दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.10% दराने व्याज दिले जात आहे. तसेच पाच वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 7.50% दराने व्याज दिले जात आहे. म्हणजेच पोस्टाची पाच वर्षांची एफडी योजना सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे.
5 लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर 5 लाख 35 हजार 403 रुपये मिळतील. दोन वर्षांच्या एफडीमध्ये पाच लाखाची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर 5 लाख 74 हजार 441 रुपये मिळतील. तीन वर्षांच्या एफडीमध्ये 5 लाखाची गुंतवणूक केली तर 6 लाख 17 हजार 538 रुपये मिळतील.
तसेच जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक व्याजदर असलेल्या 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 7 लाख 24 हजार 974 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला 2 लाख 24 हजार 974 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.