एअरटेल आणि जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनपैकी कोणता प्लॅन आहे बेस्ट ? दोन्ही प्लॅनविषयी संपूर्ण माहिती पहा…

Published on -

Jio vs Airtel Recharge Plan : रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे.

खरेतर जिओ आणि एअरटेल या देशातील दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. ग्राहक संख्येचा विचार केला असता जिओ ही कंपनी एअरटेलपेक्षा मोठी भासते. मात्र एअरटेल ही जिओपेक्षा जुनी कंपनी आहे. एअरटेलची ग्राहक संख्या देखील आता हळूहळू वाढू लागली आहे.

जिओची ग्राहक संख्या मात्र एअरटेलच्या तुलनेत अधिक वाढत आहे. दरम्यान या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत. आज आपण एअरटेल आणि जिओच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनची तुलना करणार आहोत.

आज आपण जिओचा 398 रुपयांचा आणि एअरटेलच्या 399 च्या प्लॅनची तुलना करणार आहोत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळतात हे आता आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रिलायन्स जिओचा 398 चा प्लॅन कसा आहे

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओ मधील हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. यात ग्राहकांना डेटासह OTT सबस्क्रिप्शन देखील मिळते.

शिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा देखील लाभ मिळतो. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळत असल्याने हा प्लॅन सुद्धा फायदेशीर आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटाचा लाभही मिळतो. म्हणजेच या प्लॅन सोबत ग्राहकांना 56 जीबी डाटा मिळतो.

कंपनी या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 एसएमएसची सुविधा देते. या प्लॅनमध्ये 13 OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता उपलब्ध आहे. तसेच, Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud च्या मोफत सुविधा देखील उपलब्ध आहेत.

एअरटेलचा 399 रुपयाचा प्लॅन कसा आहे

एअरटेल आपल्या ग्राहकांना 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. हा एअरटेलचा प्रीपेड प्लान आहे. एअरटेल या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये यूजर्सना 28 दिवसांसाठी फ्री कॉलिंगचे फायदे मिळतात.

या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सला दररोज 3GB डेटा देते. यासोबतच हा प्लॅन 15 OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे.

कोणता प्लॅन आहे बेस्ट

खरे तर दोन्ही प्लॅनच्या आपापल्या विशेषता आहेत. मात्र डेटाचा विचार केला असता एअरटेल चा प्लॅन हा जिओचा प्लॅनपेक्षा फायदेशीर असल्याचे समजते. कारण की एअरटेलच्या सोबत दिवसाला तीन जीबी डेटा मिळत आहे.

दुसरीकडे जिओच्या प्लॅनसोबत फक्त दोन जीबी डेली डेटा मिळत आहे. यामुळे जिओच्या प्लॅनपेक्षा एक रुपयांनी महाग असलेला एअरटेलचा प्लॅन ग्राहकांना परवडणारा आहे. तथापि ग्राहकांना जो प्लॅन आवडेल त्याच प्लॅनने रिचार्ज करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!