अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. सोन्यानं सर्वोच्च पातळी गाठली होती.
लवकरच तो 50 हजारांचा आकडाही पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली.
आज सोन्याचा भाव 128 रुपयांनी घसरून 48,425 रुपये च्या पातळीवर पोहोचला. सकाळी 10.40 च्या सुमारास तो 111 रुपयांनी घसरून 48,442 रुपयांवर व्यापार करत होता.
मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 48,553 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. सोन्याखेरीज चांदीमध्येही आज घसरण दिसून आली.
जुलैच्या डिलीव्हरीसाठीच्या दरात चांदी 470 रुपयांनी घसरून 71,341 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत होती. आता चांदी 269 रुपयांनी घसरून 70,810 रुपये प्रति किलो झाली,
तर मागील व्यापारातील चांदीचा भाव प्रति किलो 71,079 रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी सोन्याच्या किमती 102 रुपयांनी घसरून 48,025 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम