Tourist Places In Pune:- महाराष्ट्र म्हटले म्हणजे निसर्गाने समृद्ध असलेले राज्य तसेच अनेक ऐतिहासिक समृद्ध वारसा असलेली ठिकाणे,विविध प्राणी संपत्ती व वनसंपत्तीचा अनोखा संगम असलेले राज्य होय. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यांमध्ये गेला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे दिसून येतात.
त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतिहासाच्या समृद्ध अशा खानाखुणा असलेली ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांची देखील भरपूर गर्दी पाहायला मिळते. या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचा विचार केला तर या शहराला एक ऐतिहासिक असा वारसा तर आहेच.
परंतु त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा देखील बराचसा इतिहास पुणे शहराशी निगडित आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात तर पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला असे अनेक पर्यटन स्थळे बघायला मिळतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुणे शहर आणि जिल्हा खासकरून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला जर सूर्यास्ताचे अनोखे आणि आकर्षक दृश्य बघायचे असेल तर तुम्ही पुणे आणि पुणे जिल्ह्याचा परिसरात असलेल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन सूर्यास्ताचे सुंदर आणि नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवू शकतात.
त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये असलेली अशी कोणती ठिकाणी आहेत तिथून तुम्ही सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहू शकाल त्याविषयीची थोडक्यात माहिती बघू.
पुण्यातील या स्थळांना भेट द्या व सूर्यास्ताचे अनोखे दृश्य पहा
1- सिंहगड किल्ला- सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला असून तो पुण्याच्या बाहेर आहे. परंतु तुम्हाला जर सूर्यास्ताचे अनोखे आणि अद्वितीय स्वरूप पाहायचे असेल तर सिंहगड किल्ला तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय ठरतो.
जेव्हा किल्ल्यावर आपण चढतो आणि नंतर त्यावरून जेव्हा संपूर्ण पुणे शहराचे दृश्य पाहतो तेव्हा सूर्यप्रकाशाच्या रंगांच्या छटा आकाशामध्ये पसरलेल्या दिसतात हे दृश्य खूपच नयनरम्य असे दिसते.
जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सिंहगड किल्ल्याचा परिसर हा अतिशय शांत असतो व त्या ठिकाणाचे वातावरण देखील थंडगार असल्यामुळे तुम्हाला अभूतपूर्व शांतीचा अनुभव या ठिकाणी घेता येतो.
2- पवना लेक- पुणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पवना लेक असून याठिकाणी तुम्ही सूर्यास्ताचा अनोखा नजारा एका शांत वातावरणामध्ये घेऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही जलप्रपात आणि पाण्यावर पडणारे सूर्यप्रकाशाचे रंग एक निसर्गाची वेगळीच अनुभूती देतात.
या ठिकाणी असलेली शांतता आणि अनेक सुंदर दृश्य तुमच्या मनाला खूपच सुखद असा अनुभव देतात. त्यामुळे अनोखा सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासाठी पवना लेक हे एक बेस्ट डेस्टिनेशन आहे.
3- खडकवासला धरण- हे धरण सिंहगड रोडवर असून या ठिकाणी संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्या ठिकाणी सोनेरी आणि लाल रंगाने संपूर्ण आकाश रंगून जाते आणि त्या ठिकाणी एक विहंगम दृश्य तयार होते.
हे दृश्य पाहणे खूपच आनंददायी असा अनुभव देते व रोमांचक असा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी येतो. तसेच या ठिकाणाचे दृश्य आणि शांत असे वातावरण मनामध्ये एक वेगळीच अनुभूती निर्माण करतो.
4- वडगाव धरण- हे धरण पुणे शहराच्या बाहेर असून या ठिकाणाचे वातावरण अतिशय शांत असून हे ठिकाण खूपच सुंदर आहे. तुम्हाला जर सूर्यास्ताचा अनोखा नजारा पाहायचा असेल तर तुम्ही या धरणाच्या काठावर बसून रिलॅक्स होऊन सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी सूर्यास्त होत असताना सूर्यप्रकाशाचे किरणे जेव्हा पाण्यावर पडतात तेव्हा एक वेगळेच दृश्य तयार होते व हे दृश्य पाहण्याचा अनुभव अगदी खास असतो.
5- कुला गड- कुला गड देखील सिंहगड रोडवर असून हे एक नैसर्गिकदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी सूर्यास्ताचा अनोखा नजारा पाहता येतो. इतकेच नाही तर या कूला गडावरून तुम्ही पुणे शहराचे दर्शन घेऊ शकतात.
जेव्हा सकाळी सूर्योदय होतो तेव्हा सोनेरी रंगामुळे आकाशात पसरलेल्या किरणांमुळे एक खूपच सुंदर दृश्य अनुभवायला मिळते व सूर्यास्ताच्या वेळी देखील एक अनोखा अनुभव तुम्हाला अनुभवता येतो. त्यामुळे सूर्यास्त बघण्यासाठी कूला गड हे उत्कृष्ट डेस्टिनेशन आहे.