1 जानेवारी 2025 नंतर जन्मलेली मुल असतील जनरेशन बीटामधील? या अगोदरच्या जनरेशन म्हणजेच पिढींची काय होती नावे?

आजकाल बोलताना बऱ्याचदा एक शब्द आपण ऐकतो किंवा एक वाक्य बऱ्याचदा कानी येते व ते म्हणजे कोणीतरी बोलते की आमच्या पिढीत असं नव्हते किंवा आमच्या पिढीच्या वेळेस या गोष्टी नव्हत्या. यामध्ये जर बघितले तर पिढी म्हणजेच याला इंग्लिशमध्ये जनरेशन असे म्हटले जाते.

Ajay Patil
Published:
generation beta

Type Of Generation:- आजकाल बोलताना बऱ्याचदा एक शब्द आपण ऐकतो किंवा एक वाक्य बऱ्याचदा कानी येते व ते म्हणजे कोणीतरी बोलते की आमच्या पिढीत असं नव्हते किंवा आमच्या पिढीच्या वेळेस या गोष्टी नव्हत्या. यामध्ये जर बघितले तर पिढी म्हणजेच याला इंग्लिशमध्ये जनरेशन असे म्हटले जाते.

जनरेशन जर आपण बघितले तर यामध्ये वेगवेगळ्या कालावधीत जन्म झालेल्या व्यक्तींचा वेगवेगळ्या जनरेशन म्हणजेच पिढीमध्ये समावेश केला जातो व त्याला वेगवेगळे नावे देखील दिली गेली आहेत.पिढीचे वेगळेपण जर आपल्याला ओळखायचे असेल किंवा जाणून घ्यायचे असेल तर ते प्रामुख्याने त्या त्या काळी झालेले तंत्रज्ञानातील तसेच परंपरेत झालेले बदल,

जनरेशन नुसार बदललेल्या चालरीती इत्यादींच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल व यामध्ये प्रत्येक पिढीचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. कोणत्याही पिढीचं नाव हे त्या त्या काळातील सांस्कृतिक तसेच आर्थिक व ऐतिहासिक घटनांच्या आधारे ठरवले जाते.

समजा एखादी जनरेशनची सुरुवात किंवा एखाद्या जनरेशनचा शेवट हा एखाद्या महत्त्वाच्या घटनेच्या आधारे जसे की युद्ध तसेच आर्थिक वाढ किंवा एखादा मोठा घडलेला तांत्रिक बदल या आधारे प्रामुख्याने ठरवला जातो. साधारणपणे जर आपण दोन जनरेशन म्हणजेच पिढ्यांमधील अंतर पाहिले तर ते 15 ते 20 वर्षे कालावधीचे असते.

आजपर्यंतच्या जनरेशनची नावे आणि वैशिष्ट्ये

1- जनरेशन झेड(Z)- साधारणपणे 1997 ते 2009 या कालावधीत ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्या पिढीला प्रामुख्याने जनरेशन Z या पिढीतील म्हटले जाते. या जनरेशनचे किंवा पिढीचे जर आपण वैशिष्ट्ये बघितले तर मुळातच त्यांचा जन्म झाला तेव्हापासूनच त्यांना इंटरनेट आणि सोशल मीडिया सारखे प्लॅटफॉर्म अनुभवायला मिळाले.

म्हणजे तंत्रज्ञान आणि डिजिटल युगामध्ये वाढणारी ही पिढी समजली जाते. या पिढीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पिढी स्मार्टफोन आणि इंटरनेट विना राहू शकत नाही.

म्हणजे एकंदरीत इंटरनेट आणि सोशल मीडिया याचा वापर कसा करायचा याचे उत्तम ज्ञान या पिढीला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

2-जनरेशन अल्फा- ज्या मुलांचा जन्म 2010 ते 2024 या कालावधीत झालेला आहे त्यांना प्रामुख्याने जनरेशन अल्फा मधील समजले जाते किंवा त्यांची गणना जनरेशन अल्फा या गणनेत होते. या पिढीचे जर एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बघितले तर त्यांच्या जन्मा अगोदरच संपूर्ण जगामध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले होते.

ही जी काही पिढी आहे ही आता सर्वात तरुण आणि नवीन पिढी अर्थात जनरेशन म्हटले जाते. विशेष म्हणजे या मुलांचे जे काही पालक आहेत त्यातील बहुतांशी हे इंटरनेट तसेच मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या सोबत किंवा त्याचा वापर करतच मोठे झाले आहेत.

3- जनरेशन बिटा- 1 जानेवारी 2025 ते 2039 या कालावधीला आता जनरेशन बीटा किंवा पिढी असे म्हटले जाईल.अर्थातच 1 जानेवारी 2025 पासून जनरेशन बीटाचा कालावधी सुरू झाला. आता या कालावधीत जन्माला येणारी मुलं संपूर्णपणे तंत्रज्ञानाच्या सोबतीने वाढतील असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

म्हणजेच त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग हे तंत्रज्ञान असेल. तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा काळ येत आहे व या पिढीमध्ये ज्या मुलांचा जन्म होईल त्यांच्या जीवनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप मोठा परिणाम आणि प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe