लाडकी बहीण योजना महिलांना मिळवून देईल लाखो रुपये? पंधराशे रुपये मिळवून देतील सव्वा लाख! वाचा कसे?

महिला वर्गाने दर महिन्याला मिळणारे या पंधराशे रुपयांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर या पंधराशे रुपयांचे मूल्य वाढण्यात मदत होईल व पाच वर्षात हे पंधराशे रुपये महिलांना सव्वा लाख रुपये मिळवून देतील.

Ajay Patil
Published:
majhi ladki bahin yojna

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी अर्थसंकल्पामध्ये लागू करण्यात आलेली माझी लाडकी बहिणी योजना ही खूप महत्त्वाची योजना असून सध्या तरी या योजनेची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मात्र महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला दिली जाणार आहे व हे पैसे महिलांच्या बँक खात्यावर थेट पाठवले जाणार आहेत.

विशेष म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत जर आपण यामध्ये आकडेवारी बघितली तर सरकारच्या माध्यमातून 96 लाख 35 हजार महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने मिळून तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत व अजून देखील पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे पाठवले जाणार आहेत.

इतकेच नाही तर ज्या महिलांनी 31 जुलै नंतर व ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर केलेले आहेत व ज्या महिला यामध्ये पात्र ठरतील अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

अशा प्रकारची ही एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे. परंतु जर महिला वर्गाने दर महिन्याला मिळणारे या पंधराशे रुपयांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर या पंधराशे रुपयांचे मूल्य वाढण्यात मदत होईल व पाच वर्षात हे पंधराशे रुपये महिलांना सव्वा लाख रुपये मिळवून देतील.

 पंधराशे रुपये कसे बनवतील महिलांना लखपती?

आपल्याला माहित आहे की पैशांची जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यापासून आपल्याला कालांतराने खूप मोठा फायदा मिळत असतो. त्यामुळे अगदी छोटीशी गुंतवणूक देखील काही वर्षांमध्ये आपल्याला लाखो रुपयांचा परतावा मिळवून देते.

त्यामुळे महिलांनी देखील काटकसर करून दर महिन्याला मिळणारे हे पंधराशे रुपये सगळ्यात महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय म्हणजेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर खूप मोठा फायदा महिलांना होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळालेले पैसे महिलावर्ग एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात.

महिलांना पाच वर्षांमध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून साधारणपणे 90000 हजार रुपये मिळतील व हेच 90 हजार रुपये जर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवले तर पाच वर्षांमध्ये ठेवलेल्या 90 हजार रुपयांचे एक लाख 23 हजार 730 रुपये जमा होतील.

कारण एसआयपी मध्ये जे पैसे गुंतवलेले जातात त्यावर 12% साधारण वार्षिक परतावा मिळतो असे गृहीत असते. शेअर बाजाराशी निगडित असल्यामुळे म्युच्युअल फंडातील मिळणाऱ्या परताव्याची टक्केवारी कमी अधिक देखील होऊ शकते. परंतु सरासरी 12 टक्क्यांनी व्याज मिळते.

यानुसार जर एखाद्या महिलेने प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी केली तर पाच वर्षात या 90000 रुपयांचे एक लाख 23 हजार 730 रुपये जमा होतील.अशाप्रकारे या योजनेतून मिळालेल्या पैशांचे मूल्य आणखी वाढण्यास मदत होईल व महिला वर्गाला जास्तीचा फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe