ह्या देशातील महिला पितात सगळ्यात जास्त दारू !

Marathi News

Marathi News : एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रिटिश देशाची आणखी एक आगळीवेगळी ओळख आहे. या देशातील महिला जगभरात मद्यप्राशन करण्याच्या बाबतीत आघाडीवर असून जगात सर्वाधिक मद्यप्राशन करणाऱ्या महिलांमध्ये ब्रिटिश महिलांचा नंबर लागत असल्याची बाब एका अहवालातून उघड झाली आहे.

ब्रिटिश महिला या एकाच वेळी अनेक दारूचे पेग रिचवतात, असे देखील अहवालात म्हटले आहे.जगात दारू पिणाऱ्यांची मोठी संख्या आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची दारू रिचवली जाते.

दारू पिण्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही पुढे असून अशा मद्यपींच्या बाबतीत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) ने तब्बल ३३ देशांमधील दारू सेवनाचे सर्वेक्षण केले असून यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जगात सर्वाधिक मद्यपी महिला या ब्रिटनमधल्या असून महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक आहे. येथील महिला एका बैठकीत एक दोन नव्हे तर तब्बल ६ ते ७ पेग रिचवतात, असे या अहवालात म्हटले आहे.

ब्रिटनमधील २६ टक्के महिला महिन्यातून एकदा तरी या प्रमाणात दारू पितात, तर पुरुष तब्बल ४५ टक्के या प्रमाणात दारू पितात. या अहवालाची माहिती जेव्हा संकलित करण्यात आली तेव्हा ब्रिटनने रोमानिया आणि डेन्मार्कला मद्यपानात मागे टाकल्याचे समोर आले असून दुसरा क्रमांक हा रोमानिया आणि डेन्मार्कचा, तर तिसरा क्रमांक हा लक्समबर्गचा लागतो.

अल्कोहोल चेंज ब्रिटनचे मुख्य कार्यकारी डॉ. रिचर्ड पाइपर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य सेवनामुळे ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिक अधिक प्रमाणात दारू सेवन करीत असल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

मात्र, हे टाळण्यासारखे आहे. सरकारने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून स्कॉटलंड आणि वेल्सप्रमाणे इंग्लंडमध्येही कमीत कमी युनिटची किंमत तसेच दारू सेवनाचे दुष्परिमाण याची माहिती देणे, दारूचे स्पष्ट लेबलिंग आणि मार्केटिंगवर नियंत्रण आणणल्यास दारू सेवनावर नियंत्रण आणता येऊ शकते, असेही त्यांनी सुचवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe