ऐकावे ते नवलंच ! ‘हे’ आहे जगातील एकमेव असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही ! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे आणि सगळीकडे अगदीच प्रफुल्लित वातावरण पाहायला मिळतंय. पावसाळा सुरू असल्याने अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाची माहिती सांगणार आहोत जिथे कधीच पाऊस पडत नाही. 

Published on -

Worlds First Village : भारतात सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे, नैऋत्य मौसमी पावसामुळे महाराष्ट्रासहीत देशातील अनेक राज्यांमध्ये वातावरण पूर्ण अल्हाददायक बनले आहे. सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

खरेतर आपल्याकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीनाले दुथडी भरून वाहतात, यातून शेतातल्या पिकांना पाणी दिलं जातं आपल्यालाही यामुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतं. भारतात मान्सून जर समाधानकारक राहिला म्हणजेच पावसाळ्यात चांगला पाऊस झाला तर अर्थव्यवस्थेला बळ मिळतं. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनची भूमिका महत्त्वाची आहे.

पण आज आपण जगातील अशा एका गावाची माहिती पाहणार आहोत जिथे कधीच पाऊस पडत नाही. आता तुम्ही म्हणाल पाऊस पडत नाही मग तिथली लोक जगतात कशी? तर यामागे पण एक गंमत आहे. दरम्यान आज आपण जगातील असे कोणते एक गाव आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही याची डिटेल माहिती घेणार आहोत.

जगातील एकमेव गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही 

मीडिया रिपोर्ट नुसार जगातील यमन या देशांमध्ये एक गाव आहे जिथे बाराही महिने पाऊस पडत नाही. यमन या देशातील अल हुतैब हे जगातील असे एकमेव गाव आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही पण तरीही हे गाव दिसायला फारच सुंदर आहे.

येथील वातावरण मनाला प्रफुल्लित बनवते. हेच कारण आहे की यमनमध्ये पर्यटनासाठी जाणारे बहुतांशी पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात. या गावाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात आणि येथील सौंदर्याचा आनंद लुटतात.

हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. हे गाव ढगांच्या वर स्थित आहे. अल हुतैब हे विलक्षण गाव समुद्र सपाटीपासून चक्क 3200 मीटर उंचावर स्थित असल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे. दरम्यान समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर वसलेले असल्याने या गावात कधीच पाऊस पडत नाही असे तज्ञांनी सांगितले आहे.

पण, या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. हिवाळ्यात सुद्धा सकाळचा काही वेळ सोडला तर दिवसभर हवामान गरम असते. तज्ञांकडून असे सांगितले गेले आहे की यमन मधील हे अद्भुत गाव अगदीच ढगांच्या जवळ आहे. त्यामुळे अशी परिस्थिती तयार होते की पावसाचे ढग गावाच्या खालच्या भागात तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस पडत असतो.

म्हणजे हे गाव जिथे आहे त्याच्या खाली पाऊस पडतो आणि गावात पाऊस पडत नाही. या गावात पाऊस पडत नाही म्हणून येथील लोकांसाठी गावाच्या खाली पडणारे पावसाचे पाणी वर नेले जाते. यामुळे या गावातील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे दूर झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!