Worlds Smallest Country : जगात अमेरिका चायना ऑस्ट्रेलिया भारत यांसारखे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे देश आहेत आणि काही देश असे आहेत ज्यांचे क्षेत्रफळ आपल्याकडील एखाद्या गावासारखे आहेत. दरम्यान आज आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक छोट्या देशांची माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या देशांची माहिती पाहणार आहोत ते देश तुम्ही मोटरसायकल वरून सुद्धा फिरू शकतात.
हे आहेत देशातील सर्वाधिक देश
सैन मैरिनो : सॅन मारिनो हा जगातील सर्वाधिक छोट्या टॉप पाच देशांमध्ये पाचव्या नंबर वर येतो. हा देश इटलीच्या मध्यभागी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या देशाचे एकूण क्षेत्रफळ 65.16 चौरस किलोमीटर इतके आहे.

या देशाचा इतिहास फारच जुना असून या देशातील किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे स्कूटरने अर्ध्या तासात पाहता येऊ शकतात. म्हणजेच आपण जसं एखाद्या गावात फिरतो तसं तुम्ही येथे फिरू शकता.
तुवालू : जगातील सर्वाधिक छोट्या टॉप पाच देशांमध्ये या देशाचा नंबर चौथा आहे. तुवालूचे क्षेत्रफळ 25.90 चौरस किलोमीटर इतके आहे. हा देश समुद्राच्या मध्यभागी आहे.
खरे तर हा देश समुद्राच्या मध्यभागी असणार एक लहान बेट आहे. या देशात आठवड्यातून केवळ चार विमाने येतात. हा देश देखील तुम्ही मोटरसायकलवरून एक्सप्लोर करू शकता.
नाउरू : या यादीत हा देश तिसऱ्या नंबर वर येतो. या देशाचे क्षेत्रफळ 20.97 चौरस किलोमीटर इतके असल्याचा दावा केला जातो. या देशात एका वर्षात फक्त 200 टुरिस्ट येतात अशी आकडेवारी समोर आलेली आहे. मात्र आता या देशात पाहण्यासारखं काही राहिलेलं नाही.
मोनाको : जगातील एक सुंदर देश मोनाको हा देखील या यादीत आहे. जगातील सर्वाधिक छोट्या देशांच्या यादीत या देशाचा दुसरा नंबर लागतो. या देशाचे क्षेत्रफळ 2.02 चौरस किलोमीटर इतके आहे. म्हणजे हा देश एखाद्या छोट्या गावाएवढा आहे.
हा देश फ्रान्सच्या किनाऱ्यावर आहे, येथे लक्झरी कॅसिनो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि यासाठीच हा देश खरंतर प्रसिद्ध आहे. या देशाचा सुंदर किनारा आणि रॉयल पॅलेस पाण्यासारखे आहे जे की तुम्ही मोटरसायकलवरूनच अर्ध्या तासामध्ये पाहू शकता.
वेटिकन सिटी : क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात छोटा देश म्हणजेच व्हॅटिकन सिटी. या देशाचे एकूण क्षेत्रफळ 0.4921 चौरस किलोमीटर इतके असल्याचा दावा केला जातो.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात छोटा देश आहे. हा देश न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा लहान आहे. येथे फक्त 800 लोक राहतात आणि या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर आधारित आहे.