Business Idea :- असे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत की ते सकाळ किंवा संध्याकाळी सुरू करून दोन किंवा तीन तास एका जागेवर छोटेसे स्टॉल उभे करून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात. आपण बऱ्याचदा संध्याकाळी चार नंतर सुरु होणारी एखादी हातगाडी पाहतो व त्यावर समोसे किंवा वडे विकले जातात. परंतु त्या ठिकाणची असलेली गर्दी जर पाहिली तर माणसाला आश्चर्य वाटते. संध्याकाळी चार ते रात्री नऊ एवढ्याच कालावधीमध्ये अशा व्यवसायातील व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळवतात.
अगदी याच पद्धतीने देखील सकाळी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला नाष्टाचे स्टॉल दिसतात. अगदी सकाळी सात ते दुपारी दहा किंवा अकरा वाजेपर्यंत ते काम करतात परंतु दर्जेदार नाष्ट्यामुळे किंवा दर्जेदार सेवेमुळे त्या ठिकाणी ग्राहकांचे प्रचंड गर्दी होते व तेवढ्याच वेळेमध्ये ते निव्वळ नफा दोन ते तीन हजार रुपये कमवतात.
याच पद्धतीने जर तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही असाच कमी गुंतवणुकीवर, पूर्ण दिवसाचा वेळ न देता कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगला नफा मिळू शकतात. अगदी सकाळी सात ते बारा या कालावधीत तुम्ही व्यवसाय केला तरी चांगला पैसा तुम्हाला मिळू शकतो आणि हा व्यवसाय आहे इडली आणि डोसा व्यवसाय होय. याच व्यवसायाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
इडली व डोसाचा व्यवसाय फायद्याचा कसा असतो?
आजकाल धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला सकाळी उठून नाश्ता बनवणे शक्य नसते. त्यामुळे बरेच कामानिमित्त बाहेर पडणारे व्यक्ती बाहेरच नाष्टा करतात. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही इडली डोसा व्यवसाय सुरू केला तर तो खूप उत्तम असा व्यवसाय ठरू शकतो.
कारण आता व्यक्ती आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले असल्यामुळे तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खात नाहीत. त्यामुळे इडली डोसा व्यवसायाला खूप चांगला स्कोप आहे. पूर्ण दिवस न देता फक्त सकाळी सात ते 11 या वेळेत जरी हा व्यवसाय तुम्ही चालू केला तरी दिवसातून दोन ते तीन हजार रुपये तुम्ही आरामात कमावू शकतात.
इडली डोसा व्यवसायाची सुरुवात कशी करावी?
या ठिकाणी सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी जास्त लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी जागेची निवड करावी. साधारणपणे व्यवसाय चालू करण्यासाठी एक स्टॉल लागतो व इडली बनवण्यासाठी आवश्यक असणारे भांडे, एक गॅस शेगडी तसेच तवा इत्यादी गोष्टी तुम्हाला लागतात तेव्हा तुम्ही घरीच इडली बनवून ते स्टॉलवर आणून विकू शकतात.
या व्यवसायातील कमाई किती असते?
या व्यवसायातून तुम्ही आरामात दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवू शकतात. कारण हा खूप चालणारा व्यवसाय असून तुम्ही इडलीची एक प्लेट 20 रुपये व 30 रुपयांना आरामात विकू शकतात. म्हणजेच दिवसाला जर तुम्ही 50 प्लेट इडली आणि 50 प्लेट डोसा किंवा वडा विकला तर तुमची कमाई तीन हजार रुपयांपर्यंत सहजपणे पोहोचते.
या व्यवसायाला किती खर्च येतो?
इडली डोसा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पैसा टाकण्याची गरज नाही. अगदी कमीत कमी दहा हजार रुपयाच्या गुंतवणुकीत तुम्ही या व्यवसायाची सुरुवात आरामात करू शकतात. परंतु तुम्हाला जर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला एक ते दोन लाख रुपये गुंतवणूक गरजेचे आहे.