‘या’ देशांना जायला विमानाची नाही तर तुमची स्वतःची कार येईल कामाला! या देशांना जाता येते बाय रोड

देशांतर्गत प्रवासासाठी प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा आपल्या स्वतःच्या कारचा वापर आपण करत असतो. परंतु देशांतर्गत प्रवासाशिवाय तुम्हाला जर परदेशामध्ये प्रवास करायचा असेल तर मात्र विमानाशिवाय पर्याय नाही.

कारण तुम्हाला जर विदेशात जायचे असेल तर तुम्हाला रस्ते मार्गाने जाता येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना विदेशात फिरण्याची इच्छा असते. परंतु विमानाचे तिकीट अतिशय महाग असल्यामुळे प्रत्येकाला ते परवडत नाही.

विदेशात फिरण्याचे स्वप्न जरी असले तरी ते आपल्याला पूर्ण करता येत नाही. परंतु जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की त्या ठिकाणी जायला तुम्हाला विमानाची गरज भासत नाही. तुम्ही अगदी बाय रोड तुमच्या कारने या देशांना जाऊ शकतात.

त्यामुळे या लेखांमध्ये असे कोणते देश आहेत की, या देशांना जाण्यासाठी तुम्ही बाहेरून जाऊ शकता किंवा तुमच्या कारचा वापर करू शकतात त्याबद्दल माहिती घेऊ.

 या देशांमध्ये जाता येईल तुम्हाला तुमच्या कारने

1- म्यानमार हा एक भारताचा शेजारी देश असून तो भारताच्या ईशान्येकडील राज्यांना लागून आहे. त्यामुळे तुम्हाला जर म्यानमारला जायचं असेल तर तुम्ही ईशान्य कडील राज्य असलेल्या मिझोराम मधून सहज जाऊ शकतात.

याकरिता तुम्हाला म्यानमारचा व्हीसा आणि तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पर्यटनाकरिता म्यानमारला जायचे असेल तर तुम्ही नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जाऊ शकतात.

2- थायलंड थायलंडला जर तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही दिल्लीवरून सरळ रस्त्याने थायलंडला सहज जाऊ शकतात. जर आपण दिल्ली आणि थायलंड या मधील अंतर पाहिले तर ते 4198 किलोमीटर असून सतत गाडी चालवून तुम्ही 71 तासांमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकतात.

या ठिकाणी जाताना जेव्हा तुम्ही रस्त्याने प्रवास कराल तेव्हा तुमच्याकडे व्हिसा, परमिट तसेच आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, दोनशे टक्के कारनेट फी आणि लीड कारची गरज भासते.

3- भूतान हे राष्ट्र भारताच्या शेजारील राष्ट्र असून भारत आणि भूतान या दोन्ही देशांचे सीमा खूपच लहान आहे. भारतातील पश्चिम बंगाल राज्यात असलेल्या जयगाव भारत आणि भूतानला जोडते. तुम्ही तुमच्या कारणे सहजपणे भुतानला पोहोचू शकतात.

4- सिंगापूर सिंगापूर देखील भारताच्या अगदी जवळ असून या सुंदर अशा देशांमध्ये तुम्हाला रस्त्याने जाता येऊ शकते. या ठिकाणी जर तुम्ही दिल्लीवरून जायचे ठरवले तर दिल्ली आणि सिंगापूर मधील अंतर 5,926 किलोमीटर असून साधारणपणे 91 तासांमध्ये हा प्रवास तुम्ही पूर्ण करू शकतात.

रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स तसेच ट्रॅव्हल डॉक्युमेंट, स्पेशल ओव्हरलँड परमिट, पासपोर्ट तसेच कार्नेट फी आणि व्हिसा इत्यादी कागदपत्रे लागतील.

दिल्लीवरून तर तुम्हाला उत्तर प्रदेश तसेच बिहार, आसाम, नागालँड तसेच मनिपुर, म्यानमार, थायलंड आणि मलेशिया मार्गे सिंगापूरला जाता येणे शक्य आहे.

5- मलेशिया मलेशियाला जाण्यासाठी तुम्हाला 5533 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल व तुम्ही 97 तासात हा प्रवास पूर्ण करू शकतात. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला  व्हिसा, पासपोर्ट तसेच निर्गमन आणि आगमन इत्यादी कागदपत्रे व आवश्यक प्रवासासाठीची कागदपत्रे आवश्यक असतील.