Solar Panel Subsidy: घरामध्ये चालवा भरपूर प्रमाणात फ्रिज तसेच फॅन, एसी तरीही विजबिल येईल शून्य, 25 वर्षांपर्यंत वीज बिलापासून रहाल फ्री

वाढत्या विजेचे दर आणि जास्तीचे येणारे विज बिल यापासून सुटका हवी असेल तर आता सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनांचा लाभ घेऊन सोलर पॅनल उभारणे ही काळाची गरज आहे. सरकारच्या माध्यमातून आता खेड्यांपासून तर शहरांपर्यंत लोकांकरिता सोलर पॅनल रूफटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे व यामध्ये लोक सभागी होऊ शकतात व मिळणारे फायदे मिळवू शकतात. या योजनेच्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देत असून याचा लाभ घेऊन तुम्ही कमी खर्चामध्ये सोलर पॅनल बसवू शकतात.

Ajay Patil
Updated:
solar panel

Solar Panel Subsidy:- प्रत्येक महिन्याला येणाऱ्या जास्तीच्या वीजबूलामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून फटका सहन करावा लागतो. कारण आता भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये विजेचे दर गगनाला पोहोचलेले असल्यामुळे वाढत्या वीज बिलाचा सर्वसामान्यांच्या खिशावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम पाहायला आपल्याला मिळत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा वापर हा अनेक अंगाने फायद्याचा ठरेल. सौर ऊर्जेचा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.वाढत्या विजेचे दर आणि जास्तीचे येणारे विज बिल यापासून सुटका हवी असेल तर आता सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनांचा लाभ घेऊन सोलर पॅनल उभारणे ही काळाची गरज आहे.

सरकारच्या माध्यमातून आता खेड्यांपासून तर शहरांपर्यंत लोकांकरिता सोलर पॅनल रूफटॉप योजना सुरू करण्यात आलेली आहे व यामध्ये लोक सभागी होऊ शकतात व मिळणारे फायदे मिळवू शकतात. या योजनेच्या माध्यमातून सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देत असून याचा लाभ घेऊन तुम्ही कमी खर्चामध्ये सोलर पॅनल बसवू शकतात.

या सोलर पॅनलच्या माध्यमातून तयार विजेवर तुम्ही घरातील कुलर तसेच टीव्ही, फ्रिज आणि एसी चालवू शकतात व त्यामुळे तुमचे बिल शून्य होईल. घराच्या बोरवेल्स देखील तुम्ही या माध्यमातून चालवू शकतात. अशाप्रकारे हे सोलर पॅनल खूप फायद्याचे आहेत.

 सोलर पॅनल संच कसे आहेत फायद्याचे?

सोनल पॅनलच्या माध्यमातून तुम्ही घरातील सर्वच विद्युत उपकरणे चालवू शकतात. या माध्यमातून तुम्ही घरातील दोन किंवा तीन पंखे, फ्रिज तसेच सात ते आठ एलईडी लाईट, पाण्याची मोटर आणि टीव्ही यासारख्या विजेचे उपकरणे असतील तर ती तुम्ही सर्व एकत्रितरित्या चालवू शकतात.

इतके उपकरणे चालवण्यासाठी तुम्हाला दररोज सहा ते आठ युनिट विजेचा वापर करावा लागतो. हे जर उपकरणे तुम्ही सोलर पॅनल च्या माध्यमातून चालवली तर तुमच्या घरातील वीज वापरात कमालीची बचत होते. तुम्हाला दररोज सात ते आठ युनिट मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवू शकतात.

या पॅनल मुळे तयार होणाऱ्या विजेवर तुम्ही आरामात हे उपकरणे चालवू शकतात. सध्या मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनल हे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनल असून तुम्ही तुमच्या दररोजच्या  गरजेनुसार तुम्हाला या माध्यमातून विजेचा पुरवठा होतो.

 सोलर रूफटॉफ योजनेसाठी असा करावा अर्ज?

याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला https://solarrooftop.gov.in/ वर लॉगिन करावे लागेल व याशिवाय तुम्ही पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून देखील सोलर पॅनल बसवू शकतात. पीएम सूर्यघर योजनेबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही https://pmsuryaghar.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करू शकता.

 पीएम सूर्यघर योजनेतून किती मिळते अनुदान?

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत तुमच्या घरावर जर तुम्ही सोलर पॅनल बसवले तर त्यावर तुम्हाला अनुदान मिळते. घराच्या छतावर जर तुम्ही एक किलो वॅट वीज निर्मिती करू शकणारे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला एकूण अनुदान 18000 रुपये, दोन किलो वॅट साठी तीस हजार रुपये आणि तीन किलो वॅट करिता 78 हजार रुपये अनुदान मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe