Investment Tips: 100 रुपयाची ताकद कमी नाही भाऊ! पोस्टाच्या योजनेत फक्त 5 वर्षे जमा कराल पैसे तरी मिळतील लाखो रुपये

post office rd scheme

Investment Tips:- तुम्ही केलेली पैशांची बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक ही भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. आता गुंतवणूक करायची म्हटले म्हणजे तुम्हाला लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते असे यामध्ये नसते.

तुम्ही अगदी कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीत सातत्य ठेवून लाखो रुपयांचा फंड काही वर्षात जमा करू शकता. आता तुम्ही गुंतवणूक कोणत्या योजनेत करत आहात याला देखील खूप महत्त्व असतं.

गुंतवणुकीच्या दृष्टीने बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत व यामध्ये जर पोस्ट ऑफिसची योजना बघितली तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी योजनेमध्ये तुम्ही शंभर रुपयांची गुंतवणूक जरी केली तरी लाखो रुपये तुम्ही जमा करू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये साधारणपणे 6.7 टक्के वार्षिक व्याज देण्यात येत असून यामध्ये तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज देखील मिळते.

 शंभर रुपयाची गुंतवणूक कसा मिळवून देईल तुम्हाला लाखो रुपये?

छोट्यातील छोटी बचत तुम्हाला लाखो रुपयांचा फंड कसा जमा करायला मदत करते हे आपल्याला या माध्यमातून कळेल. दररोज तुम्ही शंभर रुपयांची जर बचत करत गेलात तर महिन्याला तुम्ही तीन हजार रुपयांची बचत करतात. ही तीन हजार रुपयांची बचत जर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आरडी योजनेच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये जमा करू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटर बघितले तर त्यानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला दररोज शंभर रुपये व महिन्याला त्याप्रमाणे 3000 रुपयांची आरडी केली तर पाच वर्षांमध्ये मॅच्युरिटी वर तुम्हाला 2.14 लाख रुपये मिळतील. त्यामध्ये पाच वर्षात तुमची गुंतवणूक एक लाख 80 हजार रुपये होते व व्याजातून तुम्हाला 34 हजार 97 रुपये मिळतात.

अशाप्रकारे एकूण रक्कम तुम्ही दोन लाख 14 हजार रुपये या माध्यमातून मिळवतात. तसेच पाच वर्षानंतर योजना परिपक्व झाल्यानंतर आरडी खाते तुम्हाला परत पाच वर्षे चालू ठेवता येते. यामध्ये तुम्ही कमीत कमी 100 रुपयात खाते उघडल्यानंतर दहा दहा रुपयांच्या पटीमध्ये यामध्ये पैसा जमा करू शकता व यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा नाही.

 पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचे आणखी महत्त्वाची वैशिष्ट्ये

यामध्ये एखाद्या व्यक्तीला अनेक खाती उघडता येऊ शकतात तसेच तीन जणांना मिळून एक जॉइंट अकाउंट देखील उघडता येते. जर अल्पवयीन मुला-मुलींना या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर त्यांच्या मार्फत पालक खाते उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्याचा मॅच्युरिटी पिरियड पाच वर्षाचा असतो व प्री मॅच्युअर क्लोजर म्हणजेच मुदतीपूर्वी योजना बंद करायची असेल तर तीन वर्षानंतर करता येते. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस मधील आरडी योजनेच्या खात्यामध्ये तुम्ही 12 हप्ते जमा केल्यानंतर जी एकूण रक्कम जमा झालेली असेल त्या रकमेच्या 50% पर्यंत तुम्हाला कर्ज देखील मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe