ज्या लोकांना पर्यटनाची आवड असते. पर्यटनाची आवड असलेले लोक देश-विदेशामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी जातात. एवढेच नाही तर अशा पद्धतीची आवड असणारे लोकांचा ग्रुप विविध प्रकारचे सहलींचे देखील नियोजन करतात व भारतातच नव्हे तर अगदी विदेशामध्ये देखील ट्रिप प्लॅन केली जाते.
अशा लोकांना प्रवासाची जी काही आवड असते ती पाहून भारतीय रेल्वेच्या माध्यमातून भारतातील विविध ठिकाणी फिरण्याकरिता विशेष असे पॅकेज आणले जाते व कमीत कमी दरामध्ये अनेक ठिकाणी फिरण्याची सुवर्णसंधी पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींना मिळते.

अशाच प्रकारे तुमचा देखील उत्तर भारतातील काही ठिकाणी या पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन असेल तर याकरिता भारतीय रेल्वेने एक नवीन टूर पॅकेज आणलेले आहे. हे एक फायद्याचे पॅकेज असून याचा लाभ घेऊन तुम्ही उत्तर भारतातील अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहू शकतात.
कन्याकुमारी आणि रामेश्वरम पॅकेज
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कन्याकुमारी आणि रामेश्वरम टूर पॅकेज आयोजित करण्यात आले असून ते 13 जुलैपासून सुरू होणार आहे. हे टूर पॅकेज फक्त एका दिवसाचे असणारा असून यानंतर तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाहीत. हे पॅकेज बारा रात्री आणि तेरा दिवसांसाठी असून यामध्ये तुम्हाला ट्रेन आणि बसने प्रवास करण्याची संधी देण्यात येणार आहे.
जर तुम्हाला या पॅकेज अंतर्गत ट्रेनने प्रवास करावा लागणार आहे व त्यानंतर तुम्हाला बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पॅकेज अंतर्गत जर तुम्ही शुल्क पाहिले तर दोन एसी कोच पॅकेज बुक केल्यास दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 52 हजार दोनशे रुपये इतके शुल्क आहे.
तर स्लीपर कोच मध्ये प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती 24450 रुपये इतके शुल्क आहे. म्हणजेच एका व्यक्तीला 24,450 रुपयांमध्ये तेरा दिवसांचा प्रवास करता येणार आहे व या पॅकेजमध्ये तुमचा हॉटेल आणि जेवणाचा खर्च देखील समाविष्ट असणार आहे.
जम्मू–कटरा टूर पॅकेज
जम्मू ते कटरा टूर पॅकेज हे तीन रात्री आणि चार दिवसांचे असून ते 11 जुलै रोजी दिल्लीतून सुरुवात होणार आहे. या पॅकेज अंतर्गत ट्रेन आणि कॅबने प्रवास करता येणार आहे. या पॅकेजेचे शुल्क पाहिले तर दोन लोकांकरिता प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 13 हजार 925 रुपये इतके शुल्क आहे आणि यामध्ये हॉटेल तसेच तिकीट आणि जेवणाचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही यासाठीचे तिकीट बुक करू शकतात.
चंदीगड,कुफरी आणि शिमला टूर पॅकेज
या पॅकेजेची सुरुवात 12 जुलै रोजी लखनऊ येथून होणार आहे व तुम्ही प्रत्येक शुक्रवारी या पॅकेजेसाठी तिकीट बुक करू शकणार आहात.हे पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांसाठी असून या माध्यमातून तुम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करू शकणार आहात. या पॅकेजेची फीस पाहिली तर दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती 22 हजार 60 रुपये इतके शुल्क लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला तीन दिवसांकरिता हॉटेल देखील मिळणार आहे.