Government Subsidy: 24 रुपये खर्च करून अर्ज करा आणि पाईपलाईनसाठी 15 हजार अनुदान मिळवा! वाचा संपूर्ण माहिती

Published on -

Government Subsidy:- शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतीमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणी करिता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. तसेच अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा या शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणि भरघोस उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असल्याने अशा सुविधा उभारणी करणे गरजेचे असते.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजना राबवण्यात येतात व अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उभारणे शक्य होते.

अशाच प्रकारे योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी देखील पीव्हीसी पाईप तसेच एचडीपीए साठी अनुदान दिले जाते. याच अनुदानाविषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 किती मिळते पाईपलाईनसाठी अनुदान?

शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी अनुदान घ्यायचे असेल तर या योजनेच्या माध्यमातून पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रतिमीटर या दराने अनुदान दिले जाते व ते पाचशे मीटर पर्यंत मिळते.

जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांच्या अनुदान त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते व एचडीपी पाईपसाठी  प्रति मीटर पन्नास रुपये अनुदान दिले जाते व ते 300 मीटरसाठी मिळते व जास्तीत जास्त याअंतर्गत 15 हजार रुपयांचे अनुदान एचडीपीएसाठी मिळते.

 या अनुदानासाठी असलेले नियम अटी

1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.

2- तसेच संबंधीत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे.

3- समजा लाभार्थी शेतकरी जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याला पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ दिला जातो.

4- जे शेतकरी या अंतर्गत अनुदाना करिता अर्ज करतील त्यांच्याकडे एक हेक्टर किंवा कमीत कमी एक एकर जमीन असणे गरजेचे आहे.

5- या योजनेच्या माध्यमातून पाईप खरेदी करिता 50% अनुदानाचा लाभ मिळतो व उरलेली रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागते.

6- या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

 कुठे करावा लागतो अर्ज?

पाईपलाईन अनुदान योजने करिता अर्ज करायचा असेल तर तो शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करावा लागतो. या अर्जामध्ये तुमच्याकडे असलेल्या पाण्याच्या स्त्रोता विषयीची माहिती द्यावी लागते व महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर या माध्यमातून लॉटरी काढली जाते.

लॉटरीमध्ये जर शेतकऱ्याचे नाव आले तर त्याला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते व या कागदपत्रांमध्ये जमिनीचा सातबारा तसेच आठ अ चा उतारा, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी पाईप खरेदी करणार आहात त्या डीलरशिपचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे द्यावे लागतात.

 अर्ज करण्यासाठी किती खर्च येतो?

महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा अर्ज करावा लागतो व शेतकऱ्यांना यासाठी शुल्क म्हणून 23 रुपये 60 पैसे भरणे गरजेचे असते. म्हणजेच एकंदरीत 24 रुपयात तुम्हाला हा अर्ज करता येतो व त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचे अनुदान पाईपांच्या खरेदीसाठी मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe