भारतीय वाहन बाजारामध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी एकापेक्षा एक वैशिष्ट्य असलेल्या कार लॉन्च केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि एन्ट्री लेवल कार मॉडेल्सला खूप मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी असल्याचे चित्र आहे.
कारण आजकाल जर आपण ग्राहकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर थोडा जास्त पैसा गेला तरी चालेल परंतु ड्रायव्हिंग करताना जास्तीत जास्त आरामदायी अनुभव कसा मिळेल याकडे कल असल्याचे दिसून येते. जर आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आजकाल कॉम्पॅक्ट एसयूव्हीला मोठी मागणी दिसून येते.
भारतीय बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसहित कार लॉन्च केलेले आहेत व अगदी याच पद्धतीने टोयोटा कंपनीने देखील नुकतीच भारतीय बाजारात अर्बन क्रुझर टेसर(Urban Cruiser Taisor) ही कार लॉन्च केली होती व या कारला भारतीय बाजारामध्ये खूप मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल इंजिनसह येते व कंपनीने या कारमध्ये सीएनजी इंजिन देखील दिले आहे.
काय आहेत टोयोटा अर्बन क्रुझर टेसर कारची वैशिष्ट्ये?
टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेमध्ये ही कार लॉन्च केली व आता ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीच्या माध्यमातून 1.2 लिटर, चार सिलेंडर नॅचरली अस्पिरिटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. यामध्ये नॅचरली अस्पिरेटेड इंजिन 90 एचपी पावर आणि 113 एनएमचे टॉर्क जनरेट करते.
तसेच यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑप्शनल एएमटी सह ही कार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच टर्बो पेट्रोल इंजिन पाच स्पीड मॅन्युअल सोबत ऑप्शनल सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिकही यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे टोयोटा कंपनीच्या या एसयूव्हीमध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे.
तसेच या कारमध्ये नव्याने डिझाईन केलेले बंपर, एलइडी डीआरएल आणि पुन्हा डिझाईन केलेले आलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. टोयोटा टेसर कारमध्ये नवीन डिझाईन केलेले 16 इंच डायमंड कट अलॉय हिल्स देखील मिळतात. तसेच या कारचे कॅबिन नवीन सीट अपहोलस्ट्रीसह नवीन थीम वर आधारित आहे.
तसेच क्रॉस ओव्हर मध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर तसेच स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, 360 डिग्री सराऊंड कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले देण्यात आला आहे.
सुरक्षेकरिता काय उपाय योजना आहेत?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेज देण्यात आले आहे.
किती आहे या कारचे मायलेज?
टोयोटा टेसरच टर्बो पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट साधारणपणे 21.5 किमी/ लिटर मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट 20.0 किमी प्रति लिटरचे मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंट प्रति किलो 28.05 किलोमीटर पर्यंत कमाल मायलेज देते असा कंपनीच्या माध्यमातून दावा करण्यात आला आहे.