Kadaknath Chicken Farming : तरुणांनो कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय करा आणि बक्कळ पैसा कमवा! कमी कालावधीत व्हाल लखपती

Published on -

Kadaknath Chicken Farming :- शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असून त्यातल्या त्यात आजकाल पोल्ट्री फार्मिंग हा तरुणांचा आवडता व्यवसाय ठरताना दिसून येत आहे.

पोल्ट्री फार्मिंगमध्ये सध्या बॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येत असून यामध्ये एअर कंडिशन पोल्ट्री फार्म उभारले जात आहे. त्याशिवाय अनेक देशी कोंबड्यांचे पालन देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

कुक्कुटपालनात अनेक वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. यामध्ये काही संकरित तर काही देशी जातींचा समावेश होतो. परंतु कोंबड्यांच्या या जातीमध्ये कडकनाथ कोंबडी ही कोंबडीची जात पालनासाठी खूप महत्त्वाची असून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त कमाई करण्याची संधी कडकनाथ कोंबडी पालनातून उपलब्ध होऊ शकते. कडकनाथ कोंबडी ही इतर जातींच्या कोंबड्यांपेक्षा खूपच वैशिष्ट्यपूर्ण असते. या कोंबडीचे मांस आणि अंडी खूप महाग विकले जातात.

कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय देईल लाखात पैसा

ज्या तरुणांना पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात करायची असेल त्यांच्याकरिता कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो. कारण या कोंबडीच्या चिकनला प्रचंड मागणी आहेच परंतु इतर कोंबडीच्या चिकन पेक्षा कडकनाथ कोंबडीचे दर जास्त आहेत.

आपल्याला माहित आहे की कडकनाथ कोंबडी ही काळ्या रंगाची असते व तिची चोच देखील काळी असते. एवढेच नाही तर या कोंबडीचे रक्त, मांस आणि अंडे देखील काळ्या रंगाचे असते. ही कोंबडी साधारणपणे पाच ते सहा महिन्यात तयार होते व कोंबडीचा चिकनचा रेट पाहिला तर प्रति किलो 1800 रुपये इतका आहे. या कोंबडीच्या चिकनला इतकी मागणी असण्याचे कारण म्हणजे आरोग्यासाठी हे चिकन खूप महत्त्वाचे मानले जाते. कडकनाथ कोंबडीच्या चिकन मध्ये अनेक प्रथिने युक्त असतात.

तसेच बॉडी बिल्डिंग करणारे तरुण मोठ्या प्रमाणावर कडकनाथ कोंबडीचे चिकन सेवन करतात. तसेच खायला देखील इतर कोंबड्यांच्या चिकनपेक्षा कडकनाथ कोंबडीचे चिकन चविष्ट लागते. त्यामुळे दिवसेंदिवस कडकनाथ कोंबडीला मागणी वाढताना दिसून येत आहे.

कमी कालावधीत देते जास्तीत जास्त नफा

कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय हा कमी कालावधीमध्ये जास्तीचा नफा मिळवून देणारा व्यवसाय असून साधारणपणे चार महिन्यात ही कोंबडी तयार होते व या कोंबडीच्या चिकनला बाराशे ते अठराशे रुपयांचा दर मिळतो व महत्त्वाचे म्हणजे या कोंबडीचे एक अंडे पन्नास रुपयाला विकले जाते.

जरी या कोंबडी पालनाचा खर्च जास्त असला परंतु त्या दृष्टिकोनातून नफा देखील इतर कोंबड्यांपेक्षा जास्त मिळतो. त्यामुळेच कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करणे खूप परवडण्याजोगे आहे. कडकनाथ कोंबड्या प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यांमध्ये आढळून येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News