अहमदनगर Live24 ,2 जून 2020भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगने नुकतेच विराट कोहलीच्या बिल्डिंगमध्ये घर विकत घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये हे घर असून हे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे.
आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत 64 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे घर 35व्या माळ्यावर आहे तर, युवीनं 29व्या माळ्यावर घर घेतलं आहे.
युवराजनं प्रति स्क्वेअर फूट अपार्टमेंटसाठी 40 हजार रुपये दिले आहेत. विराट कोहलीने ओमकर अपार्टमेंटमध्ये हे घर 34 कोटींना विकत घेतले होते.
टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माही मुंबईच्या वरळी भागात राहतो. रोहित शर्मा यांनी 2017 मध्ये सीफेसिंग घर घेतले होते. त्याचा फ्लॅट 6 स्क्वेअर फूट आहे. रोहितच्या घरातून अरबी समुद्राचे दृश्य दिसते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews