Zero Cibil Score Loan : अनेकदा आपल्याला संसारातील काही गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासत असते. अशा परिस्थितीत आपण आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची जमवाजमव करत असतो. मात्र पैसे उसने भेटले नाही तर आपल्या डोक्यात कर्ज घेण्याचा विचार येतो. आता कर्ज घेणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. बँकेच्या माध्यमातून कर्जासाठी वेगवेगळे निकष लादले जातात.
कर्ज घेण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. यासाठी व्यक्तीचा सिबिल स्कोर देखील मॅटर करत असतो. ज्याचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर चांगला असतो त्याला कर्ज मंजूर होतं मात्र ज्याचा सिबिल स्कोर कमी असतो अशा व्यक्तींना कर्ज सहसा मंजूर होत नाही. कोणत्याही बँके कडून कर्ज देताना सर्वप्रथम सिबिल स्कोर चेक केला जातो. मग लोन घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या क्रेडिट स्कोरच्या आधारावर कर्जाची रक्कम मंजूर होते तसेच व्याजदर बँक ठरवते.
हे पण वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..
जाणकार लोक सांगतात की ज्याचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असतो अशा व्यक्तींना लवकरात लवकर कर्ज मंजूर होतं आणि व्याजदर देखील कमी आकारला जातो. मात्र ज्या व्यक्तींनी या आधी कधीही कर्ज घेतलेले नसेल म्हणजे ज्यांचा सिबिल स्कोर झिरो असेल किंवा सिबिल स्कोर खराब असेल अशा व्यक्तींना बँकेच्या माध्यमातून कर्ज दिल जात नाही.
काही प्रकरणांमध्ये अशा व्यक्तींना देखील कर्ज मंजूर होतं मात्र यामध्ये कर्जाची रक्कम खूपच कमी असते. हे कर्ज अधिक महागडे असते म्हणजेच यावर व्याजदर अधिक आकारला जातो. दरम्यान आज आपण झिरो क्रेडिट स्कोर असताना कर्ज मिळत तर मग यासाठी काय अटी बँकेने लावून दिले आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत अटी?
जर तुम्ही याआधी कधीच कर्ज घेतलेले नसेल तर तुमचा सिबिल स्कोर हा झिरो राहणार आहे. अशा परिस्थितीत झिरो क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तींना कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत यथायोग्य असतील तर अशा व्यक्तींना झिरो क्रेडिट स्कोर असतानाही कर्ज मंजुर होत.
झिरो क्रेडिट स्कोर असलेला व्यक्ति पगारदार असेल तर त्याचे मासिक उत्पन्न हे किमान 13,000 रुपये असायला हवे. तसेच एखाद्या व्यावसायिकाचा झिरो क्रेडिट स्कोर असेल मात्र त्याला कर्ज घ्यायचे असेल तर अशा व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त असायला हवे. म्हणजेच महिन्याला इतकी रक्कम खात्यात येणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कर्ज घेणाऱ्याच वय 21 ते 57 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर झिरो असेल पण तो या अटी पूर्ण करत असेल तर त्याला कर्ज मिळू शकते. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे अशा व्यक्तींना अधिक व्याजदर द्यावा लागतो शिवाय कर्ज देखील कमी प्रमाणात मंजूर होते. म्हणजेच कमी रक्कम कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून अधिक व्याजदरात या ठिकाणी दिली जाते.
हे पण वाचा :- तरुण शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी; 2 एकर खरबूज पिकातून मिळवले साडेतीन लाखांचे उत्पन्न, पहा ही यशोगाथा