साडेसातीचा कहर लोक होतील बेजार ! साडेसातीमुळे पुढील 7.5 वर्ष ‘या’ राशीच्या लोकांना आव्हानाचा सामना करावा लागणार

राशीचक्रातील 12 पैकी तीन राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे आणि यामुळे या राशीच्या लोकांना आगामी काही वर्ष वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील सर्वच ग्रहांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये शनी ग्रहाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. वैदिक ज्योतिष शास्त्रात शनी ग्रहाच्या साडेसातीची संकल्पना सुद्धा आहे. असे म्हणतात की शनीदेवाची साडेसाती तब्बल साडेसात वर्ष असते आणि ही साडेसाती एकूण तीन टप्प्यात डिव्हाइड केली जाते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात साडेसातीची सुरुवात होते तेव्हा त्याच्यावर शनी ग्रहाची करडी नजर असते. म्हणजेच साडेसातीच्या काळात सर्व काही उलट होत असं नाही तर शनी ग्रह आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनी ग्रहाला न्यायाचा देवता आणि कर्मफळ दाता म्हणून ओळखतात.

म्हणून साडेसातीच्या काळात जर लोकांचे कर्म चांगले असतील तर त्यांना नक्कीच चांगले फळ मिळणार आहे पण जर कर्म खराब असतील तर शनिदेव अशा व्यक्तीला दंड सुद्धा देतात. दरम्यान राशीचक्रातील तीन राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे.

यापैकी एका राशीची साडेसाती यावर्षीच सुरू झाली आहे. दरम्यान आता आपण राशीचक्रातील कोणत्या तीन राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे आणि कधीपर्यंत हा साडेसातीचा काळ त्या लोकांवर राहणार आहे आणि या काळात त्या लोकांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबाबत ज्योतिष तज्ञ काय म्हणतात याची माहिती पाहूयात.

मीन : ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांची साडेसाती 2029 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे आणखी चार वर्षे या लोकांना साडेसातीचा सामना करायचा आहे. सध्या या लोकांवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि हा टप्पा सर्वाधिक आव्हानात्मक असतो.

आजारपण अपघात आर्थिक तोटा आणि ताणतणाव अशा साऱ्या अडचणींमुळे हे लोक पूर्णपणे बेजार होण्याची शक्यता आहे. साडेसातीच्या काळात नातेसंबंधांमध्ये देखील कडवटपणा येण्याची भीती असते. यामुळे या काळात या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चांगले कर्म केल्यासं या लोकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 

कुंभ : येत्या दोन वर्षांनी कुंभ राशीच्या लोकांची साडेसाती संपणार आहे. ज्योतिष शास्त्रातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 2027 मध्ये कुंभ राशीचे लोक साडेसाती पासून मुक्त होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कुंभ राशीचे स्वामीग्रह स्वतः शनी देवच आहेत. यामुळे साडेसातीच्या काळात सुद्धा या लोकांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी या लोकांना देखील चांगले कर्म करणे अपेक्षित आहे, वाईट कर्म केल्यास या लोकांना सुद्धा इतरांप्रमाणेच शनिदेव दंड देणार आहेत.

मेष : मेष राशीची साडेसाती आत्ताच सुरू झाली आहे 2025 मध्ये या राशीची साडेसाती सुरू झाली असल्याने 2032 पर्यंत या लोकांना साडेसातीचा सामना करावा लागणार आहे. या राशीच्या लोकांचा साडेसातीचा दुसरा टप्पा हा 2027 मध्ये सुरू होणार आहे आणि तो प्रचंड अडचणींचा आणि कष्टदायक राहणार आहे. त्यामुळे साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर या लोकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. 

साडेसातीच्या काळात काय करू नये 

ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, लोकांनी साडेसातीच्या काळात चुकीच्या गोष्टी करणे पूर्णपणे टाळायला हवे. छोट्याशा चुका झाल्या तरी देखील साडेसातीच्या काळात शनिदेव प्रचंड क्रोधित होतात आणि कठोर दंड देऊ शकतात. साडेसातीच्या काळात वादविवादापासून दूर राहणे, अनावश्यक खर्च टाळणे, रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक असते.

या काळात डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुम्हाला विनाकारण अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात आपल्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यायला पाहिजे. महिला, वृद्ध व्यक्ती, गरीब, कष्टाळू आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना या काळात चुकूनही त्रास देऊ नये अन्यथा साडेसातीच्या काळात तुमची अधोगती सुरु होते.

थोडक्यात साडेसाती वाईट नाही पण जे लोक वाईट कर्म करतील त्यांना साडेसातीच्या काळात शनि देवाकडून मोठा दंड दिला जाऊ शकतो. तसेच हा काळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा घेणारा काळ असतो यामुळे या काळात थोडा संयम ठेवणे सुद्धा आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!