Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहाला फारच महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. तर दुसरीकडे सूर्यग्रहाप्रमाणेच शनी ग्रह सुद्धा तितकाच महत्व आहे. शनी ग्रहाला न्यायाचा देवता म्हणून ओळखतात. दरम्यान शनीदेवाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुष्य नक्षत्रात आता सूर्य देवाची एंट्री झाली आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 20 जुलै 2025 रोजी सूर्यदेवाने नक्षत्र परिवर्तन केले. सूर्यदेव आता पुष्य नक्षत्रात आहेत. 20 जुलै रोजी झालेल्या या नक्षत्र परिवर्तनाचा 21 जुलैपासून मोठा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

काल रात्री सूर्य देवाने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि यामुळे राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार असे ज्योतिष तज्ञांनी म्हटले आहे.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
कर्क : आज पासून या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील आणि यामुळे यांचे उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. पैसा वाढला म्हणजे खर्चही होणार आहे या काळात हे लोक नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात.
जे लोक एखाद्या कंपनीत नोकरी करत आहे त्यांना नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते, या काळात बढती मिळण्याचे संकेत आहेत. एकंदरीत करिअरवाईस हा काळ विशेष फायद्याचा राहणार आहे. या लोकांना गुंतवणुकीतून देखील मोठा लाभ मिळणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये देखील हे लोक यशस्वी होतील.
तूळ : कर्क राशीच्या लोकांप्रमाणेच तुळ या राशीच्या लोकांचे हे नशीब बदलणार आहे. सूर्य देवाच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहणार आहे विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल असे बोलले जात आहे.
हे लोक एखाद्या शुभ कार्यात सहभाग नोंदवताना दिसतील. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. हा काळ नोकरी सोबतच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून देखील अपेक्षित यश देणार आहे.
कन्या : तुळ आणि कर्क या राशी प्रमाणेच कन्या राशीच्या लोकांचेही नशीब पूर्णपणे बदलून जाणार आहे. आज पासून या लोकांना आपापल्या क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. मीडिया, कम्युनिकेशन, मार्केटिंग आणि शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना या काळात अधिक यश मिळू शकते.
नोकरी करणाऱ्यांना या काळात पगारवाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे तसेच काही लोकांना प्रमोशन सुद्धा मिळू शकते. या लोकांना पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग सुद्धा सापडणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा काळ अधिक फायद्याचा राहणार आहे. एकंदरीत या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे आणि अच्छे दिन सुरू होतील.