अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लंडन : वर्षभरात कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये असामान्य कामगिरी करून इंग्लंड संघाला विजयी करून देणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयसीसीचा विश्वातील सर्वोत्तम खेळाडू ठरला असून सर गारफील्ड सोबर्स करंडकाचा मानकरीही बनला आहे.
ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट क्युमिन्स वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू, तर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

आयसीसी संघ
मयंक अग्रवाल, टॉम लाथम, मार्नस लबुशेन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वाॅटलिंग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वेगनर, नाथन लायन.
आयसीसी वनडे संघ रोहित शर्मा, शाय होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, केन विलियम्सन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहंमद शमी, कुलदीप यादव.