Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ गावांत गारपीट, अवकाळीचा तडाखा

अहिल्यानगरमध्ये पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांना गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसाचा जोर इतका होता कि काही काळ डोंगरकडेही जोरात … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील जलजीवनच्या कामांची केंद्राकडून गुप्त तपासणी ! राहुरी, राहाता, पारनेर, श्रीगोंद्यातील कामांचा समावेश

जलजीवन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना केंद्राने राबवली. परंतु या कामाबाबत प्रचंड आरोप, भ्रष्टहरेचे आरोप सातत्याने होत आलेत. आता मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या मात्र, अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलजीवन योजनेतील कामाची तपासणी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यात राहुरी, राहाता, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील योजनेतील कामाचा समावेश … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणाची कमाल ! सायकलवरून पूर्ण केला आयोध्या-प्रयागराज-काशी विश्वनाथ असा १५५० किमी प्रवास, तेही १४ दिवसांत

एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे या तरुणाने पुन्हा आणून दिलाय. या तरुणाने १४ दिवसांत तब्बल १५५० किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. आयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण असा १५५० कि.मी. प्रवास सायकल वर त्यांनी पूर्ण केला. त्यांचा या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे. भामाठामचे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधून जाणाऱ्या ‘या’ महार्गावरील वाहतूक दहा दिवस बंद ! ‘असा’ असेल पर्यायी मार्ग

नगर – दौंड या मार्गावरील नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडणीपुलाचे बांधकाम सुरु होत असल्याने कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या जड वाहतुक मार्गात १ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.रेल्वे उड्डाणपुलाच्या या बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर बनविण्यात … Read more

Ahilyanagar News : पारनेरचा मौलाना ‘यांना’ वाचवतोय ! व्यापाऱ्याच्या मुलीला मारले, आ.जगताप भडकले

अहिल्यानगर : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज (दि.१ एप्रिल ) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर … Read more

Ahilyanagar News : २५० एकरात ७०० तरुणांनी शोधले ! अखेर ‘त्या’ बेपत्ता महिलेचे गूढ उलगडले, धक्कादायक..

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील ३२ वर्षांची महिला बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तिचा शोध जवळपास २०० एकरात घेतला गेला. परंतु आता ही महिला नेवासा येथील आपल्या नातेवाईका सोबत ‘मिस्टर इंडिया’ झाली होती अशी माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिसांनी या महिलेचा शोध लावल्याने स्थानिक ग्रामस्थांसह वन … Read more

Ahilyanagar News : दुर्गम भागात पिकवली काळी मिरी ! बाराशे रुपये प्रतिकिलो भाव, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

अहिल्यानगरमधील शेतकरी हे नेहमीच विविध प्रयोग करत असतात. आता अकोले सारख्या दुर्गम भागात काळीमिरी पिकवण्याचाच प्रयोग येथील शेतकऱ्याने केलाय. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनौषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या महाळदेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे. पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी … Read more

Ahilyanagar News : हातात तलवार अन चोऱ्या.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात चोरट्यांचा नंगानाच

Ahilyanagar News : नेवासाखुर्द येथे एका घराच्या कंपाउंडमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच याच ठिकाणी जवळील एका दुकानातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरटे यात कैद झाले आहेत. धक्कादायक म्हणजे चोरट्यांच्या हातात तलवार दिसून येत आहेत. अधिक माहिती अशी : नेवासाखुर्द येथील पावन गणपती मंदिरासमोर … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ महार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात

अहिल्यानगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अपघात अन अपघातातील मृत्यूच्या काही घटना ताजा असतानाच आता सात वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. यांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेरमधील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये हा अपघात झाला. सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोर दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला. या धडके … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळणार आणखी एक नवा हायवे ! 15 हजार कोटी खर्चाचा ‘हा’ महामार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ठरणार पूरक

Ahilyanagar Highway News

Ahilyanagar Highway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्याला आणखी एक नवा महामार्ग मिळणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन महामार्ग विकसित होणार असून हा मार्ग अहिल्या नगर जिल्ह्यातून जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा संसदेत पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग प्रकल्पाची माहिती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या पुजाऱ्याच्या घरात भलतंच घडतंय ! संपूर्ण गावात भीतीच वातावरण

Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबीयांची भीती घालवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. … Read more

Ahilyanagar News : साईसंस्थानच्या आय बँकेतून यशस्वी नेत्ररोपण, सर्वसामान्यांना मिळणार नवी दृष्टी

श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्‍याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया आज यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टिहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. या नेत्रदानाच्या माध्यमातून आज संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते व … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ घाट परिसरात भयंकर वनवा ! आग विझवण्यासाठी २० तास प्रयत्न, आर्मीचे क्षेत्र जळून खाक

यंदा नगर जिल्ह्यातील विविध भागात वणव्याने चांगलाच फटका दिलाय. आता पुन्हा एकदा मोठे वृत्त हाती आले आहे. २७ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास इमामपूर घाटातील जंगलाला लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील सीमेवर वणवा लागल्याने तिन्ही तालुक्यातील वनक्षेत्र तसेच आर्मीचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. तब्बल … Read more

Ahilyanagar News : ना वाहन क्रमांक, ना डेपोचे नाव तरीही लालपरी सुसाट ! परिवहन महामंडळाकडूनच नियम धाब्यावर

वाहतुकीसंदर्भात अनेक नियम बनवलेले आहेत. सर्वांनाच हे नियम सारखे आहेत. असे असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनच हे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असच काहीस दृश्य अहिल्यानगर शहरात पाहावयास मिळाले. एसटी बसच्या पाठीमागील बाजूस वाहन क्रमांक नाही, सदर बस कोणत्या डेपोची आहे, याचाही उल्लेख नाही. तरीही ही लालपरी सुसाट रस्त्यावर धावताना दिसली. सर्वसामान्यांचा प्रवासाचा … Read more

Ahilyanagar News : तहसीलदारांच्या निलंबनानंतर अहिल्यानगरमध्ये पुन्हा मोठी कारवाई ! ‘तो’ मोठा अधिकारी लाच घेताना ताब्यात

श्रीगोंदा : श्रीगोंद्यांचे दुय्यम निबंधक सचिन खताळ लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत.पंधरा हजार रुपयांची मागणी करत तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडले आहे. तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार व मागील दस्त नोंदणीची बाकी … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ दोन रस्त्यांची नावे बदलणार ! एकाचे नाव गोपीनाथ मुंडे मार्ग तर दुसऱ्याला….

अहिल्यानगर शहरातील दोन रस्त्यांचे नामकरण होणार आहे. यातील एकाला लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग तर दुसऱ्याला स्व. रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. हे दोन्ही रस्ते अहिल्यानगर महापालिका हद्दीतील आहेत. प्रभाग २ मधील निर्मलनगर भागातील डॉ. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एसटीडी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील … Read more

Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध; राहुरी तालुक्यात कडकडीत बंद

काल (दि.२६) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घटना घडली. राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. संतप्त शिवप्रेमींनी तालुका बंदची हाक दिली होती. तालुक्यात आज (दि.२७) कडकडीत बंद पाळण्यात आला. देवळाली प्रवरा येथे यात्रा उत्सव असल्याने दुपार पर्यंत बंद … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी तयार होणार रोपवे ! 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून 2022-23 च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वत मालाची घोषणा करण्यात आली होती. याच अनुषंगाने राज्यातील विविध रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील तब्बल 29 रोपवे प्रकल्पांना मान्यता दिली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ रोपवे प्रकल्पांचा समावेश होतो. अहिल्यानगर मध्ये देखील लोकप्रिय … Read more