बापरे ! अहिल्यानगरमध्ये ‘येथे’ तब्बल तीन बिबटे जेरबंद, गावकऱ्यांत भीती

अहिल्यानगरमधील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत नित्याचीच झाली आहे. बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले, माणसांवरील हल्ले हे देखील नित्याचेच झाले आहे. आता एकाच गावात तब्बल तीन बिबटे जेरबंद करण्यात यश आलं आहे. राहुरी तालुक्यात तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे, राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणी मळा येथे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये चाललं काय ? भररस्त्यावरून सोन्याची बिस्कीटे गायब

Ahilyanagar News :अहिल्यानगरमध्ये सध्या चोरांचा सुळसुळाट सुरूआहे. अगदी आ. जगताप यांना पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार करावी लागली आहे. अनेक घटना ताजा असताना आता सोन्याचे बिस्कीट गायब करण्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना स्टेशन रोडवरील आगरकर मळा येथील एकता कॉलनी येथे घडली आहे. अज्ञात चोरट्याने … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील पाच सराईत दरोडेखोर अटक ! ‘तो’ धक्कादायक प्रकारही उघड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.२५ मार्च रोजी ही कारवाई केली असून यातील पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. बुरुडगाव रोड वरील साईनगर येथील योगेश चंगेडीया यांचे घरावर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न यांनी केला होता. सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी, (वय २५, रा. संजयनगर, काटवन खंडोबा), गोपाल राजू नायडू, (वय ३४, रा. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘तो’ ग्रामसेवक निलंबित ! सीईओंची मोठी कारवाई, केला होता ‘असा’ धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर मधून एक धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अहिल्यानगरमधील एका ग्रामसेवक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील राजेंद्र वळेकर यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. जिवंत व्यक्तीला मयत दाखवण्याचा गैरप्रकार त्यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे जिवंत व्यक्तीला मयत दाखवणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू … Read more

कर्तव्य बजावतांना अहिल्यानगरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-कश्मीरच्या तंगधार क्षेत्रात सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना एक दुर्दैवी घटना घडली. या गोळीबारात संगमनेरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ३४ एफ रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये थंडपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओही काढले

अहिल्यानगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसतायेत. नुकत्याच काही घटना ताजा असून आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे.थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२१ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. करण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील तलाठी जाळ्यात ! पतीच्या निधनानंतर वारस लावण्यासाठी महिलेकडे केली ‘ही’ मागणी

अहिल्यानगरमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या वाढत चालली कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांत लाचलुचपतने अहिल्यानगरमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. या कारवाई होऊनही अद्याप लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. आता अहिल्यानगरमधील एक तलाठी रंगेहात लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलाय. पतीच्या निधनानंतर शेत जमिनीला पत्नीची वारस नोंद लावण्यासाठी ३ हजारांची लाच … Read more

Ahilyanagar News : ‘ते’ दोन अट्टल दरोडेखोर जेरबंद, मोठा मुद्देमालही हस्तगत

जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) व किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) (दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक … Read more

Ahilyanagar News : पोलीस दिवसभर कलेक्शन करत फिरतात? पोलिस ठाण्यांत तडजोड गँग? धक्कादायक माहिती समोर

पोलिस स्टेशनमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी आहेत, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याचा दावा नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. कापड बाजारातील दुकान खाली करण्याकरता लोक येतात व त्याची तोडजोड करण्याचे काम पोलिस स्टेशनमध्ये होते. तोडजोड करणारी गँग पोलिसांची तयार झाली आहे, असेही त्यांचे म्हणणे असून, जिल्ह्यामध्ये … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ महामार्गावर प्रवाशांच्या लुटीचा थरार ! कोयत्याने मारहाण, महिलांनाही नाही सोडले, सगळं लुटले…

अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक लुटीचा थरार समोर आला आहे. कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेण्याची घटना घडली आहे. हा थरार नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात बंद पडलेल्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये दोन भीषण अपघात ! दोन ठार तिघे जखमी

नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज (ता. नगर) गावच्या शिवारात मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २५ मार्चला सकाळी घडली. परवेज बशीर शेख (वय ३३, रा. वाहिरा, ता. आष्टी, जि.बीड) असे मयताचे नाव आहे. मयत परवेज शेख हा आपल्या दुचाकीवर नगरहून सोलापूरच्या दिशेने चाललेला होता. वाळुंज गावच्या शिवारात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक … Read more

Ahilyanagar News : नगर स्टॅण्डसमोर थरार ! भरदुपारी कारमध्ये कारचालकाने महिलेचा गळा दाबला, नंतर..

बस स्थानकावरील सुरक्षा हा विषय मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे. महिलांसाठी बसस्थानके किती सुरक्षित यावर अनेक वादविवादही झाले दरम्यान आता नगर स्टॅण्डसमोर एका कारमध्ये महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्रापूरहून नगरला येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये बसून आलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण कारचालकाने हिसकावून घेतले, … Read more

Ahilyanagar News : माध्यमिक शिक्षक सोसायटीतचा निकाल लागला ! परिवर्तनचा दणदणीत विजय, पहा सविस्तर निकाल…

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा सत्तातंर झाले. विरोधी परिवर्तन मंडळाने २१ च्या २१ जागा जिंकत सत्ताधारी पुरोगामी मंडळाचा सुपडा साफ केला. विरोधकांनी या निवडणुकीत दाखवलेली एकजुट कामाला आल्याचे दिसून आले. जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या २१ संचालकमंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान झाले. आज जिल्हा उपनिबधक ( सहकार ) यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

Ahilyanagar News : आयपीएल सुरु होताच अहिल्यानगरमध्ये सट्टाबाजार खुला, बुकी झाले सक्रिय, करोडोंची उलाढाल

आयपीएल क्रिकेट म्हणजे क्रीडारसिकांचे जीव की प्राण. आयपीएल जसे क्रीडा रसिकांसाठी मेजवानी असते तसेच सट्टा लावणाऱ्यांसाठी देखील ही एक पर्वणी असते. आयपीएल सुरु होताच अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी बुकी सक्रिय झालेत. सध्या या सट्टेबाजाराकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो. वेबसाईट बाहेरच्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणांसाठी खुशखबर ! नगरच्या ‘या’ कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत ३३५ जागा भरणार, चांगला पगारही मिळणार

अहिल्यानगर मधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू झाली असून या योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात ३३५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिकता शिकता कमवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणारं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. पुढील पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यासाठी अग्रगण्य अशा … Read more

Ahilyanagar News : बापरे ! शिर्डीतील कुत्र्यांना डायबेटीसची लागण, केस लागले गळायला, नवीन आजार की आणखी काही? धक्कादायक माहिती समोर..

सध्या वातावरण अत्यंत चित्रविचित्र झाले आहे. विविध आजारही जोडायला लागले आहेत. परंतु आता शिर्डीत एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. येथे आता कुत्र्यांना डायबेटीसची लागण झाली आहे. त्यांच्या अंगावरील केस गळायला लागले आहेत. बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटे व दुधाचा आहार शिर्डीतील भटक्या कुत्र्यांना भोवला आहे. त्यांच्या अंगावरील केस गळू लागले असून, पोटात जंतू निर्मितीने ते आजारी … Read more

Ahilyanagar News : चौघांची दहशत ! जेसीबी घेऊन आले अन थेट अहिल्यानगरमधील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय पाडले

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासकीय इमारती पाडून तसेच या इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे व शासकीय मालमत्तेचा अपहार करुन अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करण्यात आले. तसेच येथील गाळेधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देत गाळे जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा … Read more

Ahilyanagar News : मुलींसोबत होतंय काय? शहर,उपनगरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली गायब

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांत प्रचंड वाढलेले दिसून येत आहे. नगर शहर, उपनगरे, तालुका भागात देखील हे प्रमाण वाढलेले दिसते. आता आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. नगर शहर परिसरातून २० मार्च रोजी एकाच दिवशी ३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्यात. यामध्ये केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी असणाऱ्या … Read more