अहिल्‍यानगर मध्‍ये संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा मोठा अभिमान – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahilyanagar News : संत साहित्‍य केवळ धर्मापुरते आणि भक्‍तीपुरते सिमीत नाही तर, समाजाच्‍या उध्‍दाराकरीता उपयुक्‍त ठरले आहे. या संत साहित्‍याने समाजामध्‍ये सत्‍व आणि तत्‍व रुजवितानाच समाजाला सत्‍य सांगून विषमता दुर करण्‍याचे मोठे काम केले असल्‍याचे गौरद्गार १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे स्‍वागताध्‍यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले. वारकरी साहित्‍य … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये पुन्हा एक मोठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात ! मोठी कारवाई

अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही अनेक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली. परंतु लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. आता पुन्हा एक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडला आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्पासाठीचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदारास ४० हजारांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना मत्स्य … Read more

ओसामा बिन लादेनला जागा नाही, मग औरंगजेबाला का ? रामगिरी महाराजांचा रोखठोक सवाल!

Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या संदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेबाला ‘आक्रांत’ संबोधून त्याच्या कबरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामगिरी महाराज यांच्या मते, औरंगजेब हा भारतीय नव्हता आणि त्याच्यासारख्या आक्रांत व्यक्तींना आदर्श मानून अराजकता पसरवण्याचे प्रकार घडतात, … Read more

Ahilyanagar News : धक्कादायक! अहिल्यानगरच्या ‘या’ देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात?

मागील काही दिवसांपासून वक्फ बोर्ड अन वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणी राज्यभरात चर्चेच्या विषय ठरत आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधील अनेक ठिकाणच्या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच संगमेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची माहिती … Read more

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपातील आर्थिक ‘देवाणघेवाण’ चव्हाट्यावर ; पैसे घेऊनच कामे? आ. संग्राम जगतापांमुळे..

अहिल्यानगर महानगरपालिका ही नेहमीच विविध गोष्टींनी चर्चेत राहते. आयुक्त जावळे यांच्या लाचप्रकरणामुळे तर मनपा राज्यात गाजली. दरम्यान महानगरपालिकेतील काही विभाग हे पैशांशिवाय काम करत नाहीत असा आरोप अनेकदा सर्वसामान्य करत असतात. परंतु आता हा मुद्दा थेट विधिमंडळात समोर आणला गेलाय. आ. संग्राम जगतापांमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटणार आहे. त्याच झालं असं की, महापालिकेतील नगररचना विभागातील … Read more

Ahilyanagar News: गुडन्यूज ! अहिल्यानगर मनपात लवकरच भरती, आ. जगतापांनी विधिमंडळात केली मागणी

अहिल्यानगरमधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच मनपामध्ये भरतीप्रक्रिया सुरु होईल असे चित्र आहे. त्याच कारण असं की या भरती संदर्भात आ.संग्राम जगतापांनी थेट अधिवेशनात विधिमंडळात मागणी केली आहे. अधिक माहिती अशी : विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ. जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये तातडीने टेक्निकल स्टाफची भरतीकरून अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करण्याची मागणी केली. शासनाने अहिल्यानगरच्या प्रलंबित समस्यांकडे गांभीर्याने पाहणे … Read more

Ahilyanagar News : इसको जिंदा नही छोडेंगे..! नगरच्या रस्त्यावर पुन्हा खुनी थरार, कोयता, चॉपरने हल्ला..

अहिल्यानगर शहरात मागील काही दिवंगत खून, खुनी हल्ले अशा अनेक घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा शहरात खुनी हल्ला झालाय. क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर काल १९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चौघांनी एकास लाथाबुक्क्‌यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत … Read more

अप्पू चौक आता हत्तीशिवाय ! ऐतिहासिक शिल्प हटवल्याने स्थानिक नाराज !

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील लाल टाकी परिसरातील प्रसिद्ध ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा अखेर महापालिकेने हटवला आहे. चौकातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पुतळा हलवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हत्ती शिल्प बसवण्याची मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले की, पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा … Read more

Ahilyanagar News : शिवजयंती मिरवणूकीत दोन गटांत तुंबळ हाणामारी , चॉपरने हल्ला ; दोघांवर उपचार सुरु

देवळाली प्रवरा : सोमवार दि. १७ मार्च रोजी राहुरी शहरात शांततेत व मोठ्या उत्साहात शिवरायांची मिरवणूक निघाली होती. रात्री सदर मिरवणूक शिवाजी चौक येथे असताना जुन्या भांडणाच्या कारणावरुन काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर काही क्षणातच दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन दोन तरुणांवर चाॅपरने वार करण्यात आले. दोन तरुणांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ पिकनिक स्पॉटवर तयार होणार रोप-वे ! 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Ahilyanagar News

Ahilyanagar News : राज्यातील गिर्यारोहकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंग करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता रोपवे विकसित केला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर हा रोपवे तयार होणार असून यासाठी आता … Read more

Ahilyanagar News : पुन्हा एकदा विटंबना, मूर्तीची तोडफोड ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावात असंतोष

पुणतांबा या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्री असलेल्या मंदिरांतील मूर्तीची तोडफोड होण्याचे प्रकार थांबता थांबेनात. येथे पुन्हा अहिल्यादेवी घाट परिसरातील श्री दत्तगुरुंच्या मूर्तीची विटंबना झाली आहे. मात्र या मूर्तीला कोणी जाणीवपूर्वक धोका पोहोचवला की दुर्लक्षित कारणामुळे ही मूर्ती विटंबित झाली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाठीमागे डिसेंबर महिन्यात  पुणतांबा येथील गोदावरी तीरावर असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये चाललंय काय? विवाहितेवर अत्याचार करुन व्हिडीओ पतीला पाठविले

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने उंचावताना दिसत असून खून, दरोडे, अत्याचार आदी घटनांनी जोर धरला आहे. आता शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवण्यात … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ४३ वर्षांचा अप्पू हत्ती आता इतिहासजमा होणार ! मनपा काढणार, त्या जागी आता..

अहिल्यानगर : नगर शहरातील अप्पू हत्ती हा तसा ऐतिहासिकच. जवळपास ४३ वर्षांपासून हा हत्ती नगरकरांची ओळख आहे. सावेडीतून दिल्लीगेट वा सर्जेपुराकडे जाताना सिव्हील हॉस्पिटलजवळील चौकात असलेला एक पाय उंचावून उभा असलेला हत्ती अर्थात अप्पू हत्ती पुतळा हा जिल्ह्यात प्रसिद्ध. परंतु आता हा ऐतिहासिक अप्पू हत्ती ४३ वर्षानंतर आता इतिहास जमा होणार आहे. महापालिकेद्वारे हा अप्पू … Read more

कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो..! आमदारकीला तिकीट देण्यासाठी नगरच्या ‘त्या’ महिलेकडून शरद पवारांच्या नेत्याने लाखो उकळले

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या महायुती सत्तेत आली आहे. दरम्यान, या विधानसभेच्या अनुशंघाने नगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता नगरमधील एका महिलेकडून दीड लाख रुपये घेऊन तिकीट मिळवून न देता पैसे ही माघारी न दिल्याची घटना समोर आली आहे. या … Read more

रक्तरंजित कट! ९ आरोपींनी मिळून केली थरारक हत्या,केस कापायला गेलेला तरुण घरी परतलाच नाही…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह केकताई येथील डोंगराळ भागात जाळून विल्हेवाट लावण्यात आली. वैभव शिवाजी नायकोडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 आरोपींना अटक केली … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : नृत्यांगनेच्या घरात मध्यरात्री महिलेच्या मदतीने दरोडा ! पोलिसही शॉक…

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात एका नृत्यांगनेच्या घरावर झालेल्या अनोख्या दरोड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. एका महिलेच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून दरोडेखोरांनी हा गुन्हा केला. ही नवीन चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहेत. जामखेड शहराच्या जवळील साकत फाट्याजवळ या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा उपयोग करून घरात प्रवेश बुधवारी मध्यरात्रीच्या … Read more

उन्हाचा तडाखा ; ‘या’ तालुक्यातील काही भागात पाणीबाणी : विहिरींनी गाठला तळ,पिके धोक्यात

Ahilyanagar News : मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे.जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांत पाणीबाणी सुरू झाली असून विहिरींची पाण्याची पातळी खालवली आहे.विहिरींनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीलाच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. गतवर्षी पावसाळ्यात जरी जेमतेम पाऊस झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी … Read more

शहरात चाललंय काय ? पाच जणांच्या टोळक्याने केला व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला

Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरी दरोडे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचसोबत महिलांचे दागिने देखील ओरबडले जात आहेत. या घटना कमी होत्या म्हणून की काय त्यात आता सावेडी परिसरात एका व्यापाऱ्यावर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे. सागर पुरुषोत्तम कुकरेजा (वय ३३, रा.प्रोफेसर कॉलनी चौक, नगर) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. … Read more