जमिनीच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- नगर पुणे रोड वरील केडगाव येथील कोतकर मळा येथे मोजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी गजाने दगडाने बेदम मारहाण करून खुनाची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमोल कोतकर यांच्या फिर्यादीवरून गंभीर मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती … Read more

स्व.अनिलभैय्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  नगर शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या यांच्या निधनाला एक वर्ष झाले. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. नगर शहरातील काँग्रेस ही स्व.अनिलभैय्या यांनी दाखवलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याच्या विचारांवर कायम काम … Read more

झेडपीतील लिफ्ट गेल्या दीड वर्षांपासून बंदच

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :-  कोरोनाकाळात जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंदच आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज जून महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लिफ्ट त्वरित सुरू करावे, अशी मागणी अभ्यंगतांमधून होत आहे. जिल्ह्याचा एवढा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ह्या ठिकाणी गाड्यांनी अचानक घेतला पेट…

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- शहरातील लालटकी भागात असलेल्या एव्हरेस्ट ऑटो कन्सल्टींग या दुकानाच्या मागे असलेल्या दुचाकी गाड्यांना आग लागल्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे .या मध्ये गाड्यांचे नुकसान झालेले आहे. आज दुपारी बाराच्या सुमाराला येथील लाल टाकी परिसरात असलेल्या एवरेस्ट ऑटो सेंटर च्या … Read more

हरित नगरसाठी ‘स्नेहबंध’चे पाठबळ महत्वाचे : उपमहापौर भोसले

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  स्नेहबंध फाउंडेशनने नगर शहर हिरवाईने फुलवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून वृक्षारोपण करुन अनेक झाडे जगवली आहेत. हरित नगरसाठी ‘स्नेहबंध’चे पाठबळ महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सावेडी येथील केशवराव गाडीलकर विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्या वेळी उपमहापौर … Read more

आठ लाख रुपयांसाठी विवाहितेचा सासरी छळ

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- पतीला दुकान खरेदी करण्यासाठी माहेरून आठ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व दिर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जून 2020 ते 16 जुलै 2021 दरम्यान शहरातील सावेडी परिसरातील तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या … Read more

मनपा निवडणूक स्वबळावरच, बूथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा – नाना पटोले

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले आहे. मुंबईच्या … Read more

रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्यासाठी मनपाने नियुक्त केली खासगी संस्था

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  अनेकदा रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार असणारे मोकाट जनावरांच्या विरुद्ध आता मनपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे जनावरे पकडण्याचे काम महापालिकेने खासगी संस्थेकडे सोपवले असून या संस्थेने मंगळवारी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरात 400 ते 700 मोकाट जनावरांची भटकंती सुरू आहे. ही जनावरे चौकाचौकांत … Read more

शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार, अदाणी मुर्दाबाद… ;

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव बदलून अदाणी एअरपोर्ट केल्याच्या प्रकरणाची नगर शहरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली इम्पेरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी सरकार मुर्दाबाद, अदाणी उद्योगपती मुर्दाबाद, अशा घोषणा … Read more

पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-स्टेट बँकेतून पाच लाख रुपयांची रक्कम काढून घरगुती का़मासाठी घेऊन जात असताना ती चाेरट्यांनी लुटली. ही घटना प्रेमदान चौकातील दत्त मंदिरा समोर दुपारच्या सुमारास घडली. मोटार सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बँग हिसकावून पोबारा केला. भर दिवसा आणि वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी किशोर … Read more

‘त्या’ निलंबित पोलीस निरीक्षकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- एका महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले होते. वाघ विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाघ याच्याविरोधात … Read more

30 लाखांच्या खाद्य तेलाचा अपहार करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्या

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 30 लाख रुपये किमतीच्या खाद्य तेलाचा अपहार केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला नगर शहरातील एकविरा चौकात अटक केली. किशोर मारूती पडदूने (वय 32 रा. बजाजनगर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुजराथ राज्यातील सुरतमधून ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये सोयाबीन खाद्य … Read more

निर्बंधांमुळे गेल्या दीडवर्षात हॉटेल व्यवसायाला कोट्यवधींचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- कोरोनामुळे सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे नगर शहरात मागील १६ महिन्यांत हॉटेल व्यवसायाला सुमारे ३०० कोटींहून अधिकचा फटका बसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे ग्रामीण अर्थकारण थांबले आहे. हॉटेल, विविध … Read more

अल्‍पवयीन मुलीचा लावला विवाह; वर- वधूच्या आई- वडीलांसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  खेळण्या, बागळण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी नवरा मुलगा, मुलगी व मुलाचे आई- वडील या पाच जणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुलगी अल्पवयीन केवळ पंधरा वर्षाची असताना … Read more

घरगुती गॅस टाकी घेताना तपासून घ्या… कारण शहरात गॅसचा होतोय काळाबाजार

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- गॅस ग्राहकांना घरपोहोच दिल्या जाणार्‍या गॅस टाक्यांमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस टाक्या भरत असलेल्या ठिकाणी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या छाप्यामध्ये 43 गॅस टाक्या पकडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भगवानराम गिरधरीराम बिष्णोई, (वय 23 जोधपुर राजस्थान), भजनलाल जगदीश बिष्णोई(रा.राजस्थान), तसेच एका अल्पवयीन मुलास … Read more

…जेव्हा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक उतरतात रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि तिसरी लाटेचा धोका ओळखून शहरात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शहरात तपासणी करुन प्रशासनाकडून सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी शहरातील चितळे … Read more

मैलामिश्रित पाणी पसरले रस्त्यावर; मनपाच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- भूषणनगर येथील सावली सोसायटीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे़. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे़ येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. नुकतेच उपमहापौर गणेश भोसले … Read more

अनधिकृत टपऱ्या काढण्यासाठी वेळोवेळी महानगरपालिकेत अर्ज देऊन देखील कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  बोल्हेगाव गांधी नगर रोड येथील रस्त्याच्या लगत असलेल्या प्लॉट धारक रहिवासी नागरिकांच्या कुटुंबीयांना घरासमोर दहशत व गुंडागर्दी करून अनधिकृत टपऱ्या टाकून अतिक्रमण केल्यामुळे वहिवाटीचा रहदारीचा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देताना रहिवासी हिम्मतराव मुरकुटे, सागर मुळे, वामन मोहोळकर, दादाराम गारुडकर, अशोक भंडारी, … Read more