नगरकर सावधान : रुग्ण वाढत आहेत … अन्यथा तिसरी लाट कोणत्याही क्षणी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   नगर शहरातील कोरोना बाधितांची संख्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अपवाद वगळता सरासरी १० च्या आत होती. परंतु, जुलैपासून हा आकडा दहाच्या पुढे गेला आहे. सोमवारी दिवसभरात नवे २० कोरोना बाधित रूग्ण आढळले. शहरात हा आकडा आता पुन्हा एकदा कासव गतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.नगर शहरातील कोरोनाची दुसरी लाट … Read more

सेनेच्या पदाधिकार्‍यासह जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सिव्हील हडको येथील गणेश चौकातील वैष्णवी लॉटरी येथे शिवसेनेचा पदाधिकारी असलेला काका शेळके याच्यासह नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. जुगाऱ्यांची नावे शिवसेनेचा पदाधिकारी काकासाहेब चंद्रकांत शेळके, सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद मोहन मगर, बंडू गणपत भोसले, … Read more

काय सांगता: नेप्ती उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या कांद्याची चोरी!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेप्ती उपबाजार समितीमध्ये सभासदांकडून लुटमार होत असून ही कांद्याची लुटमार थांबविण्यात यावी. अशा मागणी अहमदनगर ओनियन मर्चंट असोसिएशनच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना केली आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये अहमदनगर माथार्डी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम … Read more

विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता पुन्हा एकदा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या विकेंड लॉकडाऊन मध्ये नगर शहरात रविवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिलीगेट परिसरामध्ये तर कोतवाली हद्दीमध्ये टिळक रोड परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेत घराबाहेर … Read more

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 जुलैला धरणे आंदोलन

राज्यात सध्या आरक्षणाची लढाई सुरु आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी विविध समाज बांधवांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहे. याचे पडसाद नगरमध्ये देखील उमटत असून नगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली आहे. विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 जुलैला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या … Read more

शहरातील एका लसीकरण केंद्रावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांना मारहाण!

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रावर धावाधाव होत असल्याची दिसून येत आहे. यातच शहरातील महापालिकेच्या प्रोफेसर चौकातील लसीकरण केंद्रावर वाद झाला. यामध्ये भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसते. मात्र गंधे यांनी या घटनेचा इन्कार केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

रस्त्याच्या प्रश्नावरून काँग्रेसचा मनपावर मंगळवारी आसूड मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहर खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. या प्रश्नावर आवाज उठवत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या त्याचबरोबर नगर शहरातील रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याच्या मागणी संदर्भामध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने मंगळवारी महानगरपालिकेवर … Read more

शाळा हे मंदिर समजून, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विद्यादानाची आराधना केली -निता गायकवाड

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका निता गायकवाड सेवानिवृत्त झाले असता, शाळेत आयोजित सेवापुर्ती कार्यक्रमात त्यांचा गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम व ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर यांच्या हस्ते गायकवाड यांना गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विलास पेद्राम, विश्‍वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र … Read more

महापौर शेंडगे यांना संधी नेमकी कशासाठी? त्यांनी कुठे अन काय विकास केलाय दाखवा की …

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- महानगरपालिकेत पुन्हा एकदा सत्तांतर झाले आहे. अडीच वर्षे झाले की तसे सत्तांतर होण्याची आता नगर शहराला सवय झालेली आहे. मात्र, कितीही सत्तांतरे झाली तरी अपवाद वगळता विकासासाठी काम करणाऱ्यांना संधी मिळते का? आताही महापौर म्हणून शिवसेना पक्षाच्या रोहिणी संजय शेंडगे यांची वर्णी लागली आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मात्र, त्यांनी … Read more

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारला वृक्षरोपण ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर सर्व खर्चांना फाटा देत वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षरोपण अभियानाची सुरुवात सपकाळ यांच्या हस्ते रोप … Read more

आ सुरेश धस यांचा नगरमध्ये तीव्र निषेध

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  ना. विजय वडेट्टीवार यांनी बीड मध्ये येऊन दाखवावं अशी आव्हानात्मक भाषा वापरून आ. सुरेश धस यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यांचे हे विधान अक्षम्य असून ओबीसी व्ही जे एन टी च्या सर्व संघटना नाराज झाल्या असून त्या विधानाचा तीव्र निषेध करीत आहोत असे ओ. बी.सी. बाराबलुतेदार महासंघाच्या महिला शहराध्यक्षा अनुरिता … Read more

रूग्णालयात जाणार्‍या महिलेस मारहाण करत केला विनयभंग!

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- उपचार घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात जाणार्‍या एका३० वर्षीय महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री बोल्हेगाव परिसरात स्मशानभुमीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बोल्हेगाव परीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी पीडित महिलेच्या … Read more

विकासात्मक व्हिजने प्रभागातील प्रश्न सोडविले जातात – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रभाग क्र.६ मधील भुतकरवाडी अंतर्गत श्री कॉलनी येथे नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व बंद पाईप गटारं कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, सभापती रवींद्र बारस्कर, विलास ताठे, ईश्वर तोडमल, राजू तोडमल, माधुरी देशपांडे, अनुप … Read more

स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने गोरगरिबांना दिली मायेची छत्री भेट अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  नगर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील विविध भागात फिरून गोरगरीब रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या भेट दिल्या. अचानक मिळालेल्या या भेटीने गोरगरिब वंचित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नगर शहरात स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून महिनाभर बलात्कार..

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून नंतर बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . १९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली. सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, अनुदान मिळण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून होण्याच्या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या घरेलू मोलकरीण कामगारांनी भांडी घासून जोरदार निदर्शने … Read more

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या विविध योजनांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व कल्याणकारी योजनांसाठी निधी मिळण्यासाठी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, आयटी सेल संपर्क … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मास्क वाटप करुन साजरी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मास्क वाटप करुन साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने शहरातील नालेगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुशिला … Read more