तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्या लीवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी इफरा फातेमा शेख (वय 13 वर्षे) ही लीवरच्या गंभीर आजाराने त्रस्त असून, मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी तीच्या कुटुंबीयांना तातडीने लीवर ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च येणार असून, तीला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी … Read more

पहिल्याच पावसात वाहून जाणार हा रस्ता…. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण रक्कम जाणार ठेकेदाराच्या घशात !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगलाताई लोखंडे, सुरेखाताई कदम यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पालिकेमध्ये पत्रव्यवहार करून 2016 व 17 मध्ये मंजूर करून घेतलेले काम मदवाशा दर्गा ते जुनी मनपा, आशा टॉकीज ते कृष्णा मिसळ, गणेश मंदिर ते पाचपीर चावडी चौक व वाडिया पार्क ते … Read more

टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम प्रगतीपथावर स्थानिक नागरिकांचा विरोध !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरात विनापरवाना मोबाईल टॉवरकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असतना, टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेकडे सदर काम बंद करण्याची तक्रार करुन देखील महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने दोनशे स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन चोभे मास्तर यांनी जिल्हाधिकारी … Read more

नगर तालुक्यातील या गावात १० दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचा जोर कायम आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे देखील कोरोनाचा विस्फोट झाला होता. या पार्श्वभूमीवर गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. जेऊर येथे मागील महिन्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. येथे आजपर्यंत … Read more

नागरिकांत भीतीचे वातावरण ! माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   केडगाव परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाय योजना करण्यात याव्या. बंद पथदिवे सुरू करावेत. तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसवण्यात यावे अन्यथा पूर्व सुचना न देता कोरोना नियमाचे पालन करित लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला … Read more

दवाखान्याच्या कचऱ्याचा ढीग रस्त्यावर बेवारस… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सर्वत्र नागरिक धास्तावले आहे. यातच या महामारीविरुद्ध सुरु असलेली जीवघेणी लढाई पाहता दवाखाना नको असाच पवित्रा नागरिक घेत आहे. एकीकडे स्वतःसह परिसराची काळजी नागरिक घेताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यातील कचऱ्याचा ढीग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केडगाव बायपासलगत आणून … Read more

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली. अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. … Read more

प्रहार जनशक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- केंद्र सरकारने गरज नसताना कडधान्याची आयात करुन खतांचे भाव वाढविल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. जय जवान जय किसान…च्या घोषणा देत आंदोलकांने गळ्यात कडधान्याची माळ अडकवली होती. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले, जिल्हा सचिव … Read more

काँग्रेसच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त स्व.गांधी यांना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्यामुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाची क्रांती झाली. स्व. गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम झाले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे … Read more

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर ककड कारवाई करावी, अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संचालक डॉ.संदिप सुराणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले यावेली हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप सुराणा म्हणाले … Read more

भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला यांच्यामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मयत रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णालयात रात्री 1 वाजता राडा ! डॉक्टरला मारहाण करत तोडफोड…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचे थैमान सुरु आहे. काही डॉक्टर त्यांच्या परीने सर्वोत्तम असे काम करत आहेत मात्र तरीही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना नगर … Read more

शिक्षक परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन सीएमपी प्रणालीद्वारे वेळेत मिळण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत असल्याने, या प्रकरणी चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन वेळेत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय … Read more

कोरोनाच्या लढ्यात चार कर्तबगार अधिकारी ठरले सर्वसामान्यांसाठी ढाल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- शहरासह जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून, या लढ्यात सक्षमपणे आपली भूमिका पार पाडून कोरोना विरुध्द ढाल बणून लढणारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे कर्तबगार अधिकारी ठरले आहे. सर्वसामान्यांना आधार देत कोरोनाची गंभीर परिस्थिती पेलवून कोरोनाच्या चक्रव्यूहातून … Read more

बेजबाबदारांवर कारवाईसाठी नगर शहरात बारा पथकांची स्थापना

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक कठोर पाऊले उचलली आहे. यातच सध्याच्या स्थितीला शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून अशा बेफिकीर नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यातच अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहने देखील जप्त केली जात आहे. यातच आता हिंडफिरया नागरिकांवर वचक निर्माण … Read more

शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; गावगुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच दरदिवशी गुन्हेगारीच्या घटनांची नोंद देखील वाढ होत आहे. शहरात सध्या गावगुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र पोलीस प्रशासनच धाक उरलेला नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, २० मार्च … Read more

बँक कर्मचारींच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व बँक कर्मचारींचे कोरोना लसीकरण होण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने लसीकरण करुन घेण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र पाठविले आहे. शहरासह जिल्ह्यात बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने लसीकरण सुरु झाले असून, … Read more

कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना रांगेत न थांबता मिळणार लस

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना फ्रन्टलाईनचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.18 मे) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांनी घरात अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन केले होते. सदर प्रश्‍नी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची भेट घेतली असता त्यांनी … Read more