सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  शहरातील भाजी व फळे विक्रेत्या संबंधित घालण्यात आलेले निर्बंधाच्या आदेशात सुधारणा करून धोरणात्मक पद्धतीने आदेश देऊन शेतकरी, भाजी विक्रेते व नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्याची मागणी चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व कार्याध्यक्ष अरुण खीची यांनी महापालिका … Read more

दिलासादायक ! जिल्हयातील रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद होत होती. बाधितांची आकडेवारी थेट साडेचार हजारांच्या पार गेली होती. मात्र आता काहीसे दिलासादायक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या देखील वाढली आहे. तसेच दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरीचा रेट देखील … Read more

शिस्तीचे धडे देणाऱ्या मनपाच्या सुविधा केंद्रावरच नियमांचा फज्जा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या पथकाकडून करावा केली जात आहे. मात्र दुसरीकडे मनपा शेजारील माहिती सुविधा केंद्रातच नियमांचा फज्जा दळलेला दिसून येत आहे. महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले असतानाच मंगळवारी जुन्या मनपा कार्यालयासमोरील माहिती सुविधा केंद्राबाहेर नागरिकांनी … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणीसह आता वाहन होणार जप्त

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मात्र असं असलं तरीही रस्त्यावरील गर्दी अद्यापही कायम आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन आता कठोर पाऊले उचलणार आहे. नगर शहरात मंगळवारी पोलिसांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली, तर काहीजणांचे वाहनेही जप्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ हनीट्रॅपमध्ये पोलिस कर्मचा-याचा भाऊ आरोपी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता, युवतीने क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून … Read more

गरीब कुटुंबांना किराणा वाटप श्री योग वेदांत सेवा समितीचा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- सतत वाढत असलेले लॉकडाउन घराबाहेर पडण्याची सोय नाही. डोक्यावर छप्पर नाही. रस्त्याच्या कडेला पालावर राहणारे असे अत्यंत हालाकीच्या परीस्थीतीत अनेक कुटुंब आहेत. महामारीच्या काळात अनेकांसमोर रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे .अशा परिस्थितीत जायचे कुठे खायचे काय असा प्रश्न हातावर पोट असणा-याना भेडसावतो आहे. हीच गरज लक्षात घेऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा हनीट्रॅप ! क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून मागितले ३ कोटी…

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनीट्रॅप प्रकरणामुळे आता चर्चेत येवू लागला आहे. मागील आठवड्यात नगर तालुक्यातील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर हनीट्रॅप ची वेगवेगळी प्रकारणे समोर येत आहेत. क्लासवन अधिकारी ब्लॅकमेल :- नगर तालुका पोलिसांनी उघडकीस … Read more

चक्रीवादळाच्या तडाख्याने फळबागांचे नुकसान; शेतकरी हैराण!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते चक्रीवादळाचा राज्यातील अनेकभागात फटका बसला आहे. या वादळाचा नगर तालुक्यातील बहुतांशी भागाला देखील तडाखा बसला आहे. यात प्रामुख्याने कांदा व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासुन अनेक भागातील वीज गायब झाली आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेला बळीराजा चक्रीवादळाच्या तडाख्याने पुरता हैराण झाला आहे. पावसाळा तोंडावर … Read more

बेजबाबदार सांगूनही सुधारत नसल्याने अखेर प्रशासन उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्याला कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. याला तोडण्यासाठी व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन अहोरात्र सेवा बजावत आहे. एकीकडे हे सगळं असताना काही ठिकाणी नागरिक बेफिकिरी सोडायला तयार नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. यासाठी अखेर प्रशासन पुढे सरसावले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी … Read more

कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- टाळेबंदीचा काळावधी दिवसंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी मोफत देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी जिल्हाधिकारी … Read more

गरजूंच्या दारोदारी व पालावर उदरनिर्वाहासाठी पोहचली युवानची मदत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वाढत चाललेली टाळेबंदी, श्रमिक, कष्टकरी व हातावर पोट असलेल्यांचा गंभीर बनत चाललेला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, दिवस भागवाताना दोन वेळच्या जेवणाची पडणारी भ्रांत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना युवान या सामाजिक संस्थेने १००० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेल्या जीवनावश्यक मदतीने वंचिताच्या चेहर्‍यावर समाधान उमटले. युवान … Read more

तौक्‍ते वादळाचा अहमदनगर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा; मोठ्या प्रमाणात नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे,अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर मध्ये जोरदार सरी बरसल्या. हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस … Read more

तिच्या मोहजालात अनेक अडकले पण दहशतीपोटी कोणी पुढे आलेले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील एका बागायतदाराला प्रेमपाशात अडकवून नाजूक संबंधाचा व्हिडिओ काढणार्‍या तरूणीच्या मोहजालात अनेक जण अडकले आहेत. मात्र तिच्या दहशतीपोटी अद्याप कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे आलेले नाही. यातून बडे हनीट्रॅपचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तरूणीसह एजंट अमोल सुरेश मोरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले … Read more

गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला आरोग्य विभाग वैतागला!

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावपुढा-यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला वैतागले असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन गावपुढा-यांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला असुन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्व:ताच्या कुटुंबाचा विचार न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वा-याच्या थैमानाने जनजीवन विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातही बसत आहे. या वादळी वा-याच्या थैमानाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर … Read more

कोरोना रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- करोनोबाधित व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी कोविड सेंटर परिसरात जेवण मिळण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. जवळचेही मदतीला येत नाहीत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुठेच जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे माणुसकी संपली की काय? असा प्रश्न निर्माण होतो. याचा विचार करून नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील यशराज हॉटेलचे मालक राहुल जावळे यांनी … Read more

नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या चार पथकांनी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात दक्षता पथक गठीत करण्यात आले आहेत. परिमल निकम, शशिकांत नजान, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे … Read more

गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसची पिण्याचे पाईपलाईनचे काम सावेडी येथील राजकीय गुंडांनी खंडणी मिळण्याच्या उद्देशाने बंद पाडण्याच्या निषेधार्थ अर्जदार सरकारी ठेकेदार मतीन सय्यद यानी बंद पडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून काम चालू करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन मागणी करण्यात … Read more