केवळ 48 तासात पालिकेच्या पथकाने वसूल केला दीड लाखांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . तसेच संपूर्ण जिल्ह्यात कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहे . असे असतानाही अनेकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. अशा बेशिस्त व्यक्तींवर पालिकेच्या दक्षता पथकाकडून कारवाई केली जात आहे. नुकतेच नगर शहरात महापालिकेने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचे … Read more

अपूर्वा कॉम्प्युटर्सचे राजेश आठरे निधन

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- दिल्लीगेट येथील अपुर्वा कॉम्प्युटर्सचे संचालक राजेश रामकृष्ण आठरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. स्व.आठरे यांच्या पश्‍चात आई-वडिल, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे. स्व.राजेश आठरे हे गजराज ड्रायक्लिनर्सचे संचालक सुरेश चव्हाण … Read more

डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर शहरातील शासकीय रूग्णालयाच्या आवारात डॉक्टर व इतर अधिकारी, कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सफाई कामगार सचिन शाम बैद यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी आरोपी उजागरे आणि मरकड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा … Read more

दिलासादायक ! रुग्णसंख्या घटल्याने जिल्हा अव्वलवरून नवव्या स्थानावर

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्या हजारोंच्या घरात आढळून येत होती. यामुळे नगर जिल्हा बाधितांच्या संख्येत प्रथम स्थानी पोहचला होता. मात्र आता जिल्हावासीयांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. पहिल्या … Read more

शासनाचे नियम डावलून बिलांची आकारणी; महापौरांनी प्रशासनाला दिले कारवाईचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात कहर झाला आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असल्याने बाधितांना सरकारी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि उपचार मिळेनासे झाले आहेत. हीच संधी साधून खासगी हॉस्पिटल्सनी भरमसाट बिले आकारून गोरगरिबांची आर्थिक लूट सुरू केली आहे. आता याच खासगी रुग्णालयांना चाप बसणार आहे. सर्वसामान्यांची बेकायदशीररीत्या लूट करणाऱ्या रुग्णांवर कडक कारवाई करण्याचा … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे अद्यापही जिल्ह्यात कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिकांसह काही दुकानदारांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नुकतेच अहमदनगर महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मे … Read more

नगर शहर व जिल्ह्यात लसीचा तुटवडा ! झालेय फक्त इतके लसीकरण..

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी दिवसभर लसीचा तुटवडा होता. जिल्ह्यात दररोज १० ते १४ जणांना लस दिली जात होती शनिवारी मात्र २ हजार ४३५ जणांनाच लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरी भागात लसीकरणासाठी अनेक जणांनी चकरा मारल्या मात्र लस मिळाली नाही जिल्हा शासकीय … Read more

गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठी निशुल्क सेवा देणार्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल एक हजार एकतीस रुग्ण बरे होऊन घरी परतले. 4 मार्च पासून घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून व महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथे … Read more

रमजान ईद घरातच साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमजान सण शांततेत व गर्दी न करता साजरा होण्याच्या पार्श्‍वभूमीवर झेंडीगेट येथे शहरातील मुस्लिम समाजातील जबाबदार व्यक्ती, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शहराचे विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी बैठक घेतली. तर रमजान ईद घरातच साजरी करण्याचे त्यांनी आवाहन केले. पोलीस उपअधिक्षक ढुमे … Read more

शहरातील सर्व बँक कर्मचारींचे लसीकरण होण्यासाठी प्राधान्य देण्याचे मनपा आयुक्तांचे आश्‍वासन

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यासाठी … Read more

पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा जय भगवान महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करुन, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून, कठोर कारवाई करण्याची मागणी जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केली आहे. मुरलीधर तांबडे एका दैनिकाचे उपसंपादक असून, त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. केडगाव … Read more

पावसाळा आला नालेसफाई कधी मनसेच्या नितीन भूतारे यांचा आयुक्तांना सवाल?

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-पावसाळा तोंडावर आला आहे आजच केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने तर २० दिवसांनंतर पावसाळा सुरू होणार आहे . असे जाहीर केले असताना देखिल महानगर पालिका आयुक्तांना अजुन नालेसफाई बाबत जाग आलेली दिसत नाही आहे दोन वर्षा पूर्वी सीना नदी बाजूचा सर्व परिसर पाण्यात गेला होता. खोकर … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केडगावला युवकांचे रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जय बजरंग प्रतिष्ठान व भाऊ कोतकर मित्र मंडळाच्या वतीने केडगाव शिवाजीनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे आजी-माजी सभापती अविनाश घुले व मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. प्रतिक कोतकर यांनी … Read more

फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून सेवा देणार्‍या सर्व बँका व पतसंस्थेतील कर्मचारींचे कोरोना लसीकरण करावे

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आनंद लहामगे, … Read more

एक हाक मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी… एकदंत गणेश मंदिराच्या वतीने सामाजिक उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल-मे महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते, पण ती पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा … Read more

कामरगावच्या सरपंचांची गांधीगिरी : गावगप्पा मारणाऱ्यांना शिकवला असा ‘धडा’

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नियम न पाळल्याने कोरोना वाढत आहे. कोरोना राेखण्यासाठी गावात जनजागृती केली, दवंडी पिटवली. मात्र तरी देखील ग्रामस्थ कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत आिण पारावर घोळक्याने ग्रामस्थ गप्पा मारतात. अशा गप्पीष्ट ग्रामस्थांसमोर साष्टांग दंडवत घालून नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे हे गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत. सरपंचांचा हा … Read more

कुटुंबीयांच्या निरोगी अरोग्यासाठी कोरोना लसीकरण आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी निमगाव वाघा व नेप्ती येथील दीडशे ग्रामस्थांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. आरोग्य पर्यवेक्षक राहुल कोतकर यांनी कोरोना लसीचा लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, ग्रामपंचायत … Read more

टाळेबंदीत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून उत्तम काम केल्याबद्दल भिंगारला पोलीस उपनिरीक्षकाचा नागरी सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणारे पोलीस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते. मात्र टाळेबंदीत नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांचे प्रश्‍न हाताळणार्‍या अधिकार्‍याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भिंगार येथील नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांचा सन्मान केला. यावेळी सुमित गुप्ता, आदेश शिरसाठ, अशोक शिंदे, कुणालसिंग चव्हाण, नितीन सोले आदी … Read more