अरणगावच्या कोविड सेंटरला अत्यावश्यक औषधांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अरणगाव (मेहेराबाद) येथे सुरु करण्यात आलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटरला शिवमुद्रा फाउंडेशनच्या वतीने आवश्यक असलेल्या औषधांची मदत देण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब दरेकर यांनी औषधे कोविड सेंटरकडे सुपुर्द केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी व कोविड केअर सेंटरचे नोडल … Read more

व्हेंटिलेटर तर नाहीच, ऑक्सिजन बेड मिळणेही अशक्य! जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- साहेब काही तरी करा पण आम्हाला बेड उपलब्ध करून घ्या. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या सर्व आम्हाला मान्य आहेत. आज नगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये असे विनंती करणारे कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक दिसत आहेत. एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास दुरपास्त … Read more

महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात महात्मा फुले यांना जातीसंहिता मुक्तीनायक तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महासत्यबोधी अशी मानवंदना देण्यात आली. तर या महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, … Read more

महापौर म्हणतात शहरातील नागरिकांनी घाबरू नये !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात रूग्‍णसंख्‍या वाढत आहे. नगर शहर हे मुख्‍यालयाचे ठिकाण असल्‍यामुळे जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी  नगर शहरामध्‍ये येत असतात. दुर्दैवाने काहींचा मृत्‍यू होतो. मात्र ‘त्या’ कोरोना रूग्‍णावर नगर शहरामध्‍ये अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये भितीचे … Read more

विडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत द्या

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसाच्या लॉकडाउन काळात विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विडी कामगारांचा रोजगार सुरु ठेवण्यासाठी विडी कारखान्यांना घरखेप सुरु ठेवण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच प्रश्‍न बिकट … Read more

महानगरपालिकेच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटप

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- सध्याच्या बिकट परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच जन विविध उपाय योजना करून ,जागृती करून आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशा परिस्थितीत समाजिक भान जोपासणाऱ्या रोटरी प्रियदर्शिनीच्या वॉशिंग स्टेशन प्रकल्प प्रमुख डॉ. प्राची पाटील यांच्या सहकार्याने महानगरपालिकाच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा … Read more

जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्स बाबत आता अद्यावत माहिती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता 24 x 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460 असा आहे. या कंट्रोल … Read more

रेडमिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून पेशंटच्या जीवाशी खेळणारयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- रेडमिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून पेशंटच्या जीवाशी खेळणारयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी व अहमदनगर म्हधील ड्रग माफियांनवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद समवेत कैलास सोनवणे, नईम शेख, मोईज शेख, नाजीम सय्यद, आसिफ शेख आदी उपस्थित होते. भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटल येथे पोलिसांनी … Read more

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उपचार घेणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाचा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्ड क्रमांक-६ मधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी साडेतीन वाजेच्या सुमारास संपली. ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित … Read more

पालकमंत्री साहेब ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन द्या नाहीतर राजीनामा द्या

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात तसेच शहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडीसिविर इंजेक्शन साठी वणवण फिरत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉस्पिटल चे डॉक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. हा सर्व पुरवठा व्हावा या करिता पालकमंत्री साहेब जबाबदार असतात परंतू जसा … Read more

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- थोर समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस … Read more

‘सर्व जाती धर्माच्या संतांना कोरोना लस देण्यात यावी’

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवले जात आहे. या लसीकरणामुळे आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत. मात्र सध्या हे लसीकरण फक्त ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे अशाच नागरिकांना होत आहे. देशात सर्व जाती धर्माचे साधू संत आहेत. की ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यामुळे हे सर्व साधुसंत लस घेण्यापासून वंचित राहू … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यात शुभम भागाजी बुगे (रा. बुगवाडी, ता. पारनेर, जि.अ.नगर) व साथीदार विनोद सुधाकर पाटोळे. (रा. बहिरवाडी, जेऊर, ता. नगर, जि. अनगर ,) आकाश संतोष नायकोडी … Read more

पथदिवे बसवण्याचे काम हाती घ्यावे; अन्यथा आंदोलन : मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-  मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेवक मनोज कोतकर यांनी शहरातील गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे शहरामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. कॉलनी अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरातील पथदिवे बसवण्याचे … Read more

मिनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनता व व्यावसायिकांना दिलासा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लादण्यात आलेले कठोर निर्बंध मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक … Read more

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम अहमदनगरमध्ये सुरू !

अहमदनगरमध्ये काेरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मृतदेहांची अवहेलना झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने गुरुवारी रात्री शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून अमरधाममध्ये नेण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम अहमदनगरमध्ये सुरू आहे. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार … Read more

अहमदनगर मध्ये लॉकडाऊनला विरोध, अन्यथा रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार … Read more

विडी कारखाने सुरु ठेवण्याची विडी कामगारांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-  हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा उपस्थित होते. विडी कामगार हातावर पोट असलेले श्रमिक … Read more