नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- प्रशासकीय दृष्ट्या सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्धाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. श्री. थोरात आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे आज अहमदनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेने बाथरूममध्ये गळफास घेवून संपविले जीवन, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नगर शहरातील तपोवन भागातील एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाढदिवसासाठी नेवासा येथे जाण्यावरून झालेल्या वादातून ‘ति’ने बाथरूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला. नगरच्या तपोवन रोडवरील साईनगरमध्ये गुरूवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा आज तोफखाना पोलिसांत दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे अविनाश घुले झाले सभापती !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांची आज दुपारी निवड झाली आहे. आज गुरुवार दि. 4 मार्च रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी अविनाश घुले व … Read more

माजी विद्यार्थ्याकडून पुरस्काराची रक्कम शाळेच्या रंगकामासाठी देणगी

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक पुरस्कार मिळालेले न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संतोष पोपटराव कानडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळालेली बक्षिसाची रक्कम आपल्या गावाकडील शाळेस रंगकामासाठी मदत दिली. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक … Read more

अन्यथा आत्मदहन करण्याचा भिंगारच्या व्यापार्‍याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाईन चौकात दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता अ‍ॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैश्यासाठी मानसिक त्रास देणार्‍या महिलेवर कारवाई करुन सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमित कुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. सदर महिले विरोधात कारवाई न झाल्यास दि.15 मार्च रोजी जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळावे

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आले असून, जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, निखिल कुर्‍हाडे, प्रसाद सामलेटी, पोपट लोंढे, … Read more

शहराचा चेहरामोहरा बदलू : जगताप

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. गुलमोहर रोड आणि पाइपलाइनच्या विकासकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासकामासाठी विकास आराखडा तयार करून विकासकामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत. जमिनीअंतर्गत कामे सध्या शहरात सुरु आहेत. ती कामे मार्गी लागल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे. … Read more

शिवसैनिकांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  हिंदूधर्मरक्षक स्व.अनिलभैय्या राठोड हे आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांच्या अकाली निधनाने सामान्य शिवसैनिक पोरके झाले आहेत. शिवसैनिक अनिलभैय्यांना कदापी विसरू शकत नाहीत. पण आता नगर शहराला किरणभाऊ काळेंच्या निर्भिड नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन लखन छजलानी यांनी केले आहे. छजलानी यांच्यासह अनेक सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहर … Read more

डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते. … Read more

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, विशाल बेलपवार, अर्जुन बेरड, दिलीप ठोकळ, संपत बेरड, … Read more

वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी शहरात रविवारी कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- शहरातील सर्जेपुरा छबु पैलवान तालिम येथे अहमदनगर शहर कुस्ती तालीम सेवा संघाच्या वतीने रविवार दि.21 फेब्रुवारी रोजी 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी शहर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी शहरातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन … Read more

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या शहराध्यक्षपदी संदीप हजारे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी संदीप खंडू हजारे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या हस्ते मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारे यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्‍वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग … Read more

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी घातला पेट्रोल पंपाला चपलांचा हार !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-  पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,महसूल मंत्री ना.बाळासाहेब … Read more

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण,पोलीसांकडे तक्रार करणार्‍यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिकांमध्ये भिती !

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. अनेक अवैधधंदेवाल्यांचे राज-रोसपणे कलेक्टर संबोधल्या जाणार्‍याशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात आल्याने त्या अवैधधंद्यांवर कारवाई केली जात नाही. पोलीसांकडे तक्रार करणार्‍यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैधधंद्यांचा … Read more

लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या वर्ग दोनच्या जमीनी लाटल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्‍यांवर गुन्हे दाखल होण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने मार्केड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार … Read more

नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता शिवजयंती दिनी स्वयंसेवी संघटनांची लोकचळवळीची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शहराचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी नगर-पुणे ट्विनसिटीत रुपांतर होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवारी 19 फेब्रुवारीला स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोकचळवळीची घोषणा केली जाणार आहे. रेल्वे स्टेशन रोड येथील लोखंडी पुल येथे सकाळी 11:30 वाजता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे … Read more

अहमदनगर शहर व जिल्ह्याला क्रमांक एकचा बनविण्याचा पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी आवश्यर ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. १५ व्या वित्त … Read more

नगर शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यास कायम कटिबध्द – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नरत असते. पूर्वी खेळाकडे करियर म्हणून पाहिले जात नव्हते. मात्र आता सरकार राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंना थेट नोकरीही देते. खेळाचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीनेही आहे. क्रीडा क्षेत्रात चांगले योगदान देत खेळाडू आपल्या गावाचे, राज्याचे, देशाचे नाव उंचावतात. नगरमध्ये क्रीडा क्षेत्राला चालना देण्यास … Read more